शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

होय, शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपा अगतिक : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:42 IST

होय, शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपा अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल अशी भीती महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देहोय, शिवसेनेसोबत युतीसाठी भाजप अगतिक : चंद्रकांत पाटीलयुती नाही झाली तर काँग्रेसचा विजय  

कोल्हापूर : होय, शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपा अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल, अशी भीती महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमची अगतिकता महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. सर्वसामान्य माणसाच्या सुखासाठी ही युती होणे आवश्यक आहे. काँग्रेसचे सरकार आले तर महाराष्ट्रात पुन्हा काय होईल, याचा अनुभव जनतेने घेतला आहेच, परंतु तरीही शिवसेनेला युती करायची नसेल तर ‘इटस ओके..!’ जे व्हायचे ते होईल त्याला आम्ही घाबरत नाही, असाही इशारा पाटील यांनी दिला.केंद्रातील भाजपा सरकारच्या चार वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद झाली. पालघरमध्ये सत्तेतील या दोन पक्षांत इतका टोकाचा संघर्ष सुरु असल्याने राज्यात पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का असे विचारता मंत्री पाटील म्हणाले,‘तुम्ही युती तुटली म्हणता परंतु सत्तेत आल्यापासून गेल्या चार वर्षात आमची युती होती कुठे..? आम्ही एकही निवडणूक एकत्र लढलेली नाही.

(...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील)

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीमुळे दोन पक्षांत जास्त कटूता निर्माण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खालच्या पातळीवर येऊन राजकारण केले. श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीचा विषय हा दोन पक्षांतील कौटुंबिक प्रश्न  होता. वनगा कुटुंबात गेली चाळीस वर्षे सत्तेची पदे आहेत.

श्रीनिवास वनगा यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. संघामुळेच त्यांचे शिक्षण झाले. इतके उपकार असतानाही ते आपल्यावर अन्याय झाला म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे रडत गेले. ठाकरे घराण्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून एखाद्याला उचलून आणून न्यायनिवाडा करण्याची एक परंपरा आहे. कुणावरही अन्याय झाला तर ते त्याचा निकाल त्यांच्या पद्धतीने लावतात. परंतु हा विषय दोन पक्षांशी संबंधित होता. वनगा कुटुंबात मुलास उमेदवारी द्यायची की सुनेला एवढाच प्रश्न होता.

वनगा त्यांच्याकडे न्याय मागायला गेल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून मुलग्यास उमेदवारी द्या असे सांगितले असते तरी हा प्रश्र्न मिटला असता. परंतू त्यांनी फिर्याद ऐकून घेवून थेट निकालच देवून टाकला. शिवसेनेला वनगा परत भाजपकडे जातील याची भिती होती त्यामुळेच त्यांना व त्यांच्या आईलाही शिवसेनेने दोन दिवस गायब केले होते.’

चोरलेली खुर्ची आणि शिवसेना..उद्धव ठाकरे यांनी मैत्रीत राजकारण आणल्याची टीका करून मंत्री पाटील म्हणाले,‘शिवसेनेने केलेले राजकारण मनाला लागणारे आहे. दुसऱ्याच्या घरातील खुर्ची उचलून नेता आणि ती माझीच असल्याचा हक्क सांगण्यातला हा प्रकार आहे. शिवसेनेच्या कृत्याचा पक्षावर आघात झाला. त्यामुळेच मुख्यमंत्रीही त्वेषाने या निवडणूकीत उतरले आहेत.’ 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर