शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

यंदा धुराडी १५ आॅक्टोबरपासून पेटणार

By admin | Updated: September 22, 2015 00:11 IST

साखर हंगामास पावसाची भीती : गुरुवारी मंत्री समितीची मुंबईत बैठक

विश्वास पाटील- कोल्हापूर  --आगामी साखर हंगामाचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीची बैठक गुरुवारी (दि. २४) सकाळी अकरा वाजता मुंबईत होत आहे. परतीचा पाऊस नाही झाला तर यंदाच्या हंगामातील कारखान्यांची धुराडी १५ आॅक्टोबरपासून पेटण्याची चिन्हे आहेत. मागील हंगामातील वाजवी आणि किफायतशीर किंमत (एफआरपी)अजून देता आलेली नाही, त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’कशी द्यायची या विवंचनेत कारखानदारी आहे.यंदाचा हंगाम सुरू होण्यास घसरलेले साखरेचे दर, ‘एफआरपी’आणि परतीचा पाऊस या तीन गोष्टी परिणामकारक ठरणाऱ्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जास्त असल्याने पुढे पाणीटंचाई होऊन आलेले पीक वाळून जावू नये म्हणून त्या जिल्ह्यातील हंगाम एक आॅक्टोबरपासूनच सुरू करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांचाही तसाच प्रयत्न आहे. त्यानुसार कारखान्यांनी बॉयलर पेटविण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने १५ आॅक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा घटस्थापना दि. १३ आॅक्टोबरला आहे. दसरा दि. २२ ला तर दिवाळी दि. १२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर येण्यात सणांचा अडथळा असतो. साधारणत: दिवाळी झाल्यावरच हे मजूर ऊसतोडणीसाठी येतात परंतु यंदा ऊस जास्त असल्याने हंगाम लांबला तर अडचणी वाढतील त्यामुळे दिवाळीच्या अगोदरच हंगाम सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. कोल्हापूरला अनंत चतुर्दशीनंतर अथवा दसऱ्याच्या सुमारास हमखास पाऊस पडतो तसा पाऊस झाल्यास हंगाम १५ आॅक्टोबरच्याही पुढे जाईल. पाऊस काय करतो आणि संघटनांची भूमिका काय राहते या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.केंद्र सरकारने एफआरपी देण्यासाठी सॉफ्ट लोन मंजूर केले आहे परंतु काही कारखान्यांचे नेटवर्थ उणे आहे. बँकेच्या कर्जाच्या निकषांमध्ये काही कारखाने बसत नाहीत. शिवाय यंदा कर्ज काढून ‘एफआरपी’ दिली, पुढच्या हंगामाचे काय..? हंगाम सुरू केला आणि ‘एफआरपी’का दिली नाही म्हणून सरकारने बेड्या ठोकण्याची भाषा सुरू केली तर काय करणार, अशीही भीती कारखानदारांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गट समितीची बैठक गुरुवारी (दि.२४) मुंबईत होत आहे. त्यामध्ये यंदाच्या साखर हंगामाबाबत शासन म्हणून काय भूमिका घ्यावी यासंबंधीचे धोरण आम्ही ठरवू. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे बिले द्यावीच लागतील याबाबत सरकार ठाम आहे.- चंद्रकांतदादा पाटीलसहकार मंत्री.मंत्री समितीची बैठक झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे हंगामाबाबतचे धोरण निश्चित करू. कारखानदार म्हणतात तेवढे पुढच्या वर्षीच्या हंगामाचे चित्र भयावह नाही. पाऊस झालाच नाही तर साखर साधारणत: एक नोव्हेंबरच्या सुमारास जयसिंगपूरची ऊस परिषद घेण्याचा विचार आहे. गतवर्षीही ती एक नोव्हेंबरलाच झाली होती.- राजू शेट्टी, खासदार.एफआरपीची देणी..आॅगस्टअखेर राज्यातील शेतकऱ्यांची देय रक्कम : २८०० कोटी‘सॉफ्ट लोन’मधून मिळणारी रक्कम : १८५० कोटीआतापर्यंत वाटप झालेली रक्कम : ६०० कोटी‘सॉफ्ट लोन’ देऊनही शिल्लक राहणारी रक्कम : १००० कोटीसंभाव्य गाळप २०१६कारखाने सुरू : १६०गाळप टन : ७५०साखर : ८५ लाख टन