शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

ोल्हापूरच्या साखर उताऱ्यात यंदा घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:46 IST

उसाच्या वाढीचा फटका : विभागातील २९ कारखान्यांच्या हंगामाची सांगता

कोल्हापूर : उसाची कमी झालेली वाढ, अपरिपक्व उसाच्या गाळपामुळे यंदा कोल्हापूर विभागाच्या उताऱ्यात घट झाली आहे. आतापर्यंत ११.९८ टक्के उतारा आहे, विभागातील २९ कारखान्यांची धुराडी थंड झाली आहेत. त्यामुळे यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम ऊस टंचाईमुळे तसा अडखळतच सुरू झाला. एफआरपी व १७५ रुपयांचा पहिला हप्ता जरी निश्चित झाला असला तरी कर्नाटकात बहुतांशी कारखान्यांनी प्रतिटन २७०० रुपये पहिली उचल दिल्याने सीमाभागातील कारखान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर व सांगली जिल्हा अंतर्गत उसाची पळवापळवी झालीच, पण कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात ऊस गेल्याने बहुतांशी कारखान्यांची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच धुराडी शांत झाली. पाणीटंचाईमुळे उसाची वाढ कमी झाली. उसाची पळवापळव होणार म्हणून मिळेल तो ऊस गाळप करण्याचा सपाटा कारखान्यांनी लावला होता. स्थानिक उसाची वाट न पाहता मिळेल त्या ठिकाणाहून ऊस आणल्याने ताज्या उसाचे गाळप झाले नाही. या सर्वाचा फटका उसाच्या उताऱ्यावर झाला. गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. साधारणत: १२.६९ टक्के साखर उतारा राहिला. सांगलीमध्ये ८० लाख टन उसाचे गाळप होऊन १२.१० टक्के उतारा राखण्यात कारखान्यांना यश आले. यंदा कोल्हापुरात ९९ लाख ४१ हजार टन, तर सांगलीमध्ये ४८ लाख ६९ हजार टन असे १ कोटी ४७ लाख टनाचे गाळप झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा हा ११.९८ टक्के राहिला आहे.