शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आदमापुरातील बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव २८ मार्चपासून, दोन वर्षांनंतर भरणार यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 12:58 IST

सरवडे : कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल दोन वर्षानंतर आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थानचा वार्षिक भंडारा उत्सव व अमावस्या यात्रा ...

सरवडे : कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल दोन वर्षानंतर आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थानचा वार्षिक भंडारा उत्सव व अमावस्या यात्रा मंगळवार २२ मार्च  ते शनिवार २ एप्रिल अखेर होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन, कायदा व सुव्यवस्थेसाठी  देवस्थान समिती, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी व ग्रामस्थ यांची बैठक पार पडली.

या बैठकीत यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विभागाच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी  येणाऱ्या सर्व भक्तांना दर्शन व महाप्रसाद  व उत्सवा दरम्यान अनुचित प्रकार घडू व दुर्घटना घडू नये कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून दक्ष रहावे, सार्वजनिक आरोग्य, पाण्याची सोय, वाहनांचे पार्किंग, पोलीस बंदोबस्त व अन्य स्वयंसेवक यंत्रणा सज्ज करणे,  पार्किंग व्यवस्था, मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासह सुविधा बाबत चर्चा झाली. कोरोना महामारीबाबतचे नियम व जनजागृतीचे फलक,  भक्तांच्या सोयीसाठी जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना करण्यात आल्या.असा आहे उत्सव सोहळाभंडारा उत्सव व हरिनाम सप्ताहाचा २२ मार्च रोजी  प्रारंभ, सोमवार २८ मार्च रोजी जागर, मंगळवारी महाप्रसाद होईल. या दोन दिवशी तीन राज्यातून येणा-या सुमारे ३ लाख भाविकांसाठी नियोजन केले जाणार आहे. बुधवार ३० मार्च रोजी श्रींचा पालखी सोहळा, १ एप्रिल रोजी अमावस्या व शनिवारी गुढीपाडवा असल्याने १० दिवस हा उत्सव सोहळा सुरु राहणार आहे.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसिलदार अश्विनी वरुटे, आरटीओ अधिकारी विजयसिंह भोसले, पोलिस निरीक्षक संजय मोरे, एस. टी. आगार गारगोटी व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धुमाळ, मंडल अधिकारी राहूल शिंदे, तलाठी धनाजी पाटील,  देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले याच्यासह व्यापारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं