शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

जैन्याळच्या यशवंत बांबरे याचे चांद्रयान मोहिमेत योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:28 IST

गावातील दूध संस्थेत (डेअरी) मापाडी, पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करत शिक्षण पूर्ण करून ‘इस्त्रो’मध्ये शास्त्रज्ञ अभियंता म्हणून रुजू झालेल्या जैन्याळ (ता. कागल) येथील यशवंत सखाराम बांबरे या २७ वर्षीय युवकाने जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-२ या मोहिमेत योगदान दिले आहे. या मोहिमेतील संशोधन प्रक्षेपण टीममध्ये त्याचा समावेश होता. त्याच्या माध्यमातून कोल्हापूरचा सन्मान झाला आहे.

ठळक मुद्देजैन्याळच्या यशवंत बांबरे याचे चांद्रयान मोहिमेत योगदानइस्त्रोमध्ये तीन वर्षांपासून कार्यरत; कोल्हापूरचा सन्मान

सेनापती कापशी/कोल्हापूर : गावातील दूध संस्थेत (डेअरी) मापाडी, पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करत शिक्षण पूर्ण करून ‘इस्त्रो’मध्ये शास्त्रज्ञ अभियंता म्हणून रुजू झालेल्या जैन्याळ (ता. कागल) येथील यशवंत सखाराम बांबरे या २७ वर्षीय युवकाने जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-२ या मोहिमेत योगदान दिले आहे. या मोहिमेतील संशोधन प्रक्षेपण टीममध्ये त्याचा समावेश होता. त्याच्या माध्यमातून कोल्हापूरचा सन्मान झाला आहे.श्रीहरीकोटा येथून भारताने यशस्वीपणे भरारी केलेल्या चांद्रयान-२ ही इस्त्रोची महत्त्वाकांक्षी योजना सत्यात उतरविण्यासाठी जे अनेक संशोधक परिश्रम घेत होते. त्यातील संशोधन प्रक्षेपणाची जबाबदारी त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरकडे होती. या सेंटरच्या टीममध्ये यशवंत याचा समावेश होता.

जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या प्रणालीची जबाबदारी या टीमने सांभाळली. चांद्रयान-२ मोहिमेसाठी गेल्या चार महिन्यांपासून यशवंत हा श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या अंतराळ संशोधन केंद्रात कार्यरत होता. यापूर्वी जून २०१७ आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या मोहिमेतदेखील यशवंत सहभागी झाला होता.लहानपणीच आईचे छत्र हरपले, वडिलांनी गावात रोजंदारीवर काम करून कष्टाने यशवंत आणि त्याचे भाऊ गुरुदास यांचे पालनपोषण केले. शिक्षणासाठी हमीदवाडा येथील मामाने मदत केली. आर्थिक चणचण व गरिबीची जाणीव असल्याने पिग्मी एजंट, दूध संस्थेत मापाडी म्हणून काम करत शिक्षण पूर्ण केले.

यशवंत याने प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयात पूर्ण केले. बारावी देवचंद महाविद्यालयात पूर्ण करत असताना अनेक अडचणी आल्या. मेणबत्तीच्या उजेडात देवचंद महाविद्यालयातील व्हरांड्यातील काळ्या फरशीलाच पाटी मानली.

विज्ञानाची सूत्रे पाठ केली. त्यानंतर घरची प्रचंड गरिबी असताना पडेल ते काम करत जिद्दीने पुणे येथे बी. ई. मेकॅनिकल पूर्ण केले. वृत्तपत्रातील जाहिरात वाचून ‘इस्त्रो’च्या स्पर्धा परीक्षा त्याने दिली. दिल्लीला परीक्षेला जाण्याकरिता आर्थिक चणचण भासत होती, तरीही त्यावर मात करून तो दिल्लीत पोहोचला. त्यावेळी संपूर्ण भारतातून ज्या ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून केवळ दोघे निवडले गेले. त्यामध्ये यशवंतचा समावेश होता.

इस्त्रोमध्ये दि. १३ मे २०१६ रोजी तो दाखल झाला. गेल्या तीन वर्षांपासून येथे शास्त्रज्ञ अभियंता म्हणून काम करत आहे. परिस्थितीशी संघर्ष करत जिद्द आणि मेहनत घेतली, तर यशस्वी इतिहास रचता येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण यशवंत हे आहे.

 

विक्रमसाराभाई स्पेस सेंटरमध्ये शास्त्रज्ञ अभियंता म्हणून मी कार्यरत आहे. चांद्रयान-२ चे प्रक्षेपण आणि त्या ठिकाणी आलेला अनुभव मी आयुष्यात विसरू शकणार नाही; त्यामुळे हा क्षण माझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. ‘चांद्रयान’च्या यशस्वी भरारीने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. संपूर्ण जगाला भारताने आपली अवकाश संशोधन क्षेत्रातील ताकद दाखविली आहे.- यशवंत बांबरे

 

 

टॅग्स :isroइस्रोkolhapurकोल्हापूर