शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

महाडिकांकडे जाणारे ठराव झेरॉक्स कॉपी, मंत्री मुश्रीफ यांचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:43 IST

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमहाडिकांकडे जाणारे ठराव झेरॉक्स कॉपी, मंत्री मुश्रीफ यांचा चिमटा ‘गोकुळ’मध्ये मुश्रीफसोबत असल्याचा सतेज पाटील यांचा निर्वाळा

कोल्हापूर : भाजपकडून ४00 ठराव आल्याची केलेली वल्गना ही अतिशयोक्तीच आहे. मागीलवेळीही सत्ताधाऱ्यांकडेच सर्वाधिक ठराव होते; पण मते किती पडली, याची आठवण करून देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कितीही गठ्ठ्याने ठराव जाऊ देत, असे सांगताच मध्येच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहावर विविध विभागांच्या आढावा बैठका घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी या दोघांनी एकत्रित संवाद साधला.

‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपची ताकद महाडिकांच्यामागे राहणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, ‘मोठे बोलणे, अतिशयोक्तीपूर्ण बोलणे, ही काहींची सवयच झाली आहे. त्यातून भाजपकडे ४00 ठराव असल्याचे म्हटले गेले आहे. कुणाकडे किती ठराव आहेत, यावर काही ठरत नसते. मागीलवेळच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले.

थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ हा सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे. मागीलवेळी मी एकाकी लढत दिली होती.

आता मुश्रीफ आमच्यासोबत असल्याने संघर्ष अधिक तीव्र होईल. त्यांनी कितीही ठराव गोळा करू देत, भले एकगठ्ठा करू देत, काही फरक पडत नाही. मल्टिस्टेट ठरावावेळी काय घडले होते, हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला. 

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील