शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

वाह, क्या बात है! कलादालनात विशेष मुलांचे चित्रप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:31 IST

निसर्गाने शरीरात उणिवा ठेवल्या म्हणून काय झाले? मन तरी आम्ही घडवू शकतो. मनातील भावभावनांना आकार देऊ शकतो. त्यातून आयुष्याच्या कॅन्व्हासवर जगण्याचे उत्तम चित्र रेखाटू शकतो, याची प्रचितीच शाहू स्मारक भवनच्या कलादालनात विशेष मुलांनी काढलेली सुंदर चित्रे पाहून येत आहे.

ठळक मुद्देवाह, क्या बात है! कलादालनात विशेष मुलांचे चित्रप्रदर्शनस्वयंम या शाळेतील मतिमंद अर्थात विशेष मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन

कोल्हापूर : निसर्गाने शरीरात उणिवा ठेवल्या म्हणून काय झाले? मन तरी आम्ही घडवू शकतो. मनातील भावभावनांना आकार देऊ शकतो. त्यातून आयुष्याच्या कॅन्व्हासवर जगण्याचे उत्तम चित्र रेखाटू शकतो, याची प्रचितीच शाहू स्मारक भवनच्या कलादालनात विशेष मुलांनी काढलेली सुंदर चित्रे पाहून येत आहे. कुणीही सहज प्रेमात पडावे अशी ही चित्रे पाहताक्षणीच ‘वाह, क्या बात है!’ अशी दाद तर मिळवत आहेतच; शिवाय ती विकत घेऊन कलेला आर्थिक बळही मिळत आहे. उद्घाटनादिवशीच लाखभर रुपयांना पाच चित्रे विकली गेली.कसबा बावड्यातील स्वयंम या शाळेतील मतिमंद अर्थात विशेष मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन रविवारपासून दसरा चौकातील शाहू कलादालनात सुरू झाले. ९ मार्चपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी उद्योगपती विनोद घोडावत यांनी केले.

यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव, क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परिख, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे व्ही. बी. पाटील, सतीशराज जगदाळे, निरंजन वायचळ, महेंद्र परमार, अमरदीप पाटील, शोभा तावडे, कलाशिक्षक बाजीराव माने प्रमुख उपस्थित होते.प्रदर्शनात स्वयंम शाळेच्या उद्योगकेंद्रातील १० मुलांनी काढलेली ४० चित्रे आहेत. यात सौंदर्य, आनंद, ऊर्जा, जमीन, तारांगण, वादळ, महत्त्वाकांक्षा, सोबत अशा मनातील भावभावना दर्शविल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून अविरत कष्टातून या मुलांनी ही चित्रे तयार केली आहेत. फ्रेमिंगसह जवळपास ७० हजारांवर खर्च झाला आहे. या प्रदर्शनात चित्रांबरोबरच मुलांनी तयार केलेल्या फाईल्स, विविध कलात्मक वस्तूही येथे आहेत.

जहाँगीर आर्ट गॅलरीत लवकरच प्रदर्शनस्वयंमच्या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या या चित्रांचे प्रदर्शन पहिल्यांदाच कोल्हापुरात होत आहे. आता पुढील टप्प्यात जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविण्याचे नियोजन आहे. एकदा तरी मुंबईच्या या जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरावे, असे प्रत्येक चित्रकाराचे स्वप्न असते.

कलेची किंमत ठरवता येत नाही, तशी विशेष मुलांनी तयार केलेल्या चित्रांचीही किंमत ठरवण्यात आलेली नाही. मुलांना प्रोत्साहन मिळावे याच हेतूने प्रदर्शन भरले आहे; पण ज्याला कुणाला ते विकत घ्यायचे असेल त्याने हे चित्र काढण्यामागचे मुलांचे कष्ट, त्यांच्या जाणिवा आणि या चित्रांतून या मुलांसाठीच साधने घेण्यासाठी मदत होणार आहे, हे लक्षात ठेवावे, एवढीच संयोजकांची भावना आहे.

 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर