शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईट आर्मीकडून जखमी घारींना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:22 IST

कोल्हापूर : आर. के. नगर व शाहूपुरी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन घारींना व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिले. व्हाईट ...

ठळक मुद्देव्हाईट आर्मीकडून जखमी घारींना जीवदानविविध प्रकारच्या २० हून अधिक पक्ष्यांना पुन्हा निसर्गात सोडले

कोल्हापूर : आर. के. नगर व शाहूपुरी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन घारींना व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिले. व्हाईट आर्मीने आजवर किंगफिशर, करकोचा, बदक, मोर, घार, भैरी ससाणा, कावळा, कबूतर, चिमणी अशा विविध प्रकारच्या २० हून अधिक पक्ष्यांना, तसेच जखमी अवस्थेतील प्राण्यांना जीवदान देऊन पुन्हा निसर्गात सोडले आहे.आर. के. नगर परिसरातील विक्रम कुलकर्णी यांनी व्हाईट आर्मीला घार जखमी अवस्थेत असल्याचे सांगितले. हे कळताच जवानांनी घारीला अलगद घेऊन डॉ. अनिल पाटील यांच्याकडे नेले. मुका मार आणि अशक्तपणा आलेल्या या घारीवर उपचार करण्यात आले. तसेच रविवारी (दि.२८) शाहूपुरीतील विल्सन पुलाशेजारी घार जखमी असल्याचे असिफ पत्रिवाले यांनी कळवले.

व्हाईट आर्मीच्या जवानांनी पाहणी केली असता, बाजूच्या इमारतीच्या एका होल्डिंगवर घारीचे घरटे दिसले. वाढलेल्या उष्म्यामुळे घार खाली पडली होती. डॉ. दीपक कदम यांच्याकडे घारीवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

या दोन्ही घारींना इराणी खणीजवळ निसर्ग माहिती व प्रशिक्षण केंद्र येथील वातानुकूलित हवेत व प्रशस्त जागेत मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. उपचारांसह त्यांच्या आहारावरही विशेष लक्ष देण्यात आले. व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ कोटलगी, प्रशांत शेंडे, शैलेश रावण यांनी विशेष परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर