कोल्हापूर : चंद्रदर्शन झाल्याने आज बुधवारपासून रमजानच्या पवित्र पर्वाला सुरुवात होत आहे. पहिल्या रोजाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी मुस्लीम बांधवांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. फळे, सुकामेवा, बेकरी व दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीला प्राधान्य होते. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रमजान साध्या पध्दतीने साजरा करण्याबरोबरच राज्य शासनाच्या गृह विभागाने मागदर्शक सूचनांचेही परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यानुसार सार्वजनिक ठिकाणी नमाज वा इफ्तारसाठी एकत्र येता येणार नाही. घरात राहूनच इबादत करावी लागणार आहे.
इस्लाम कॅलेंडरनुसार चौथ्या महिन्यातील रमजान हा अत्यंत पवित्र मानला जातो. भुकेची जाणीव व्हावी, त्यातून दान धर्माची प्रवृत्ती वाढावी या हेतूने पहाटेपासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता महिनाभर कडक रोजे अर्थात उपवास केले जातात. यानिमित्ताने सामूहिक नमाज व इफ्तार पार्टीही होतात. पण गेल्या वर्षीपासून या सर्वावर निर्बंध आले आहेत. आताही कोरोना वाढत असल्याने आणि लॉकडाऊन असल्याने यावर्षी देखील नियम पाळावे लागणार आहेत. राज्याच्या गृहविभागाने तशा सूचना प्रसिध्दीस दिल्या असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.
चौकट ०१
पूर्ण रमजान महिन्यात दररोज तराबीह, दर शुक्रवारची नमाज, २७ वा रोजा यांच्यासह दररोज इफ्तार पार्ट्या होतात. पण यावर्षी यापैकी एकही करता येणार नाही. शुक्रवारी मशिदमध्ये जाऊन कुणालाही नमाज पठण करता येणार नाही. घरातच नमाज अदा करावी लागणार आहे. २७ वा रोजा अर्थात बडी रात घरातच साजरी करावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी येऊन नमाज पढता येणार नाही.
चौकट ०२
उद्याची सहरी : सकाळी ४. ५४
आजचा इफ्तार : संध्याकळी ६.५२
महिनाभराचे वेळापत्रक
दिनांक सहरी इफ्तार
१४ ४.५५ ६.५१
१५ ४.५४ ६.५२
१६ ४.५३ ६.५२
१७ ४.५२ ६.५२
१८ ४.५२ ६.५२
१९ ४.५१ ६.५३
२० ४.५० ६.५३
२१ ४.४९ ६.५३
२२ ४.४९ ६.५३
२३ ४.४८ ६.५३
२४ ४.४७ ६.५४
२५ ४.४६ ६.५४
२६ ४.४६ ६.५४
२७ ४.४५ ६.५५
२८ ४.४४ ६.५५
२९ ४.४३ ६.५५
३० ४.४२ ६.५६
०१ ४.४२ ६.५६
०२ ४.४१ ६.५६
०३ ४.४० ६.५६
०४ ४.४० ६.५६
०५ ४.३९ ६.५७
०६ ४.३९ ६.५७
०७ ४.३८ ६.५७
०८ ४.३८ ६.५७
०९ ४. ३७ ६.५८
१० ४.३७ ६.५८
११ ४.३६ ६.५९
१२ ४.३५ ६.५९
१३ ४.३४ ६.५९