शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सौंदत्ती यात्रेला मानाचे ‘जग’ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:36 IST

कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’चा गजर, भंडाºयाची उधळण करत फुलांनी सजलेले रेणुकादेवीचे मानाचे जग हलगीच्या कडकडाटात, मंगलमय, धार्मिक वातावरणात रविवारी सौंदत्ती यात्रेसाठी रवाना झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती (कर्नाटक) येथे शनिवारी (दि.२ डिसेंबर) रेणुकादेवीची यात्रा होत आहे. कोल्हापुरातून मानाचे चार जग दरवर्षी सौंदत्ती यात्रेला जातात. ओढ्यावरील यल्लम्मा मंदिर येथील मधुआई ...

कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’चा गजर, भंडाºयाची उधळण करत फुलांनी सजलेले रेणुकादेवीचे मानाचे जग हलगीच्या कडकडाटात, मंगलमय, धार्मिक वातावरणात रविवारी सौंदत्ती यात्रेसाठी रवाना झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती (कर्नाटक) येथे शनिवारी (दि.२ डिसेंबर) रेणुकादेवीची यात्रा होत आहे. कोल्हापुरातून मानाचे चार जग दरवर्षी सौंदत्ती यात्रेला जातात. ओढ्यावरील यल्लम्मा मंदिर येथील मधुआई जाधव, रविवार पेठेतील संदीप पाटील, गंगावेशमधील केराआई, बेलबाग येथील शिवाजीराव आळवेकर हे या मानाच्या जगांचे मानकरी आहेत.बेलबाग येथे शिवाजीराव आळवेकर यांच्या मानाच्या जगाची महापौर हसिना फरास यांच्या हस्ते व माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर आणि माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या उपस्थितीत आरती झाली. त्यानंतर दुपारी हा जग सौंदत्ती यात्रेसाठी रवाना झाला. त्यानंतर दुपारी विविध ठिकाणांहून फुलांनी सजलेले जग बिंदू चौकातील गजेंद्रलक्ष्मी मंदिरात एकत्र आले. येथेही जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष विजया डावरे आणि करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते आरती झाली. सौंदत्ती येथे २ डिसेंबर रोजी यात्रा असली तरी गुरूवारी (दि. ३०) भाविक एस.टी. बसेस व वाहनांतून रवाना होतात.याप्रसंगी जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष विजया डावरे, माजी अध्यक्ष अच्युतराव साळोखे, गजानन विभूते, दीपक जाधव, अशोकराव जाधव, करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील, प्रशांत खाडे, संजय मांगलेकर, बाबूराव पाटील, आदी उपस्थित होेते.नियोजनासाठी आमदारांसोबत बैठकया यात्रेच्या नियोजनासाठी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानकच्या हॉलमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठक आयोजित केली आहे. यासाठी दोन्हीही संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना, भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.भाविक गुरुवारी जाणारकोल्हापुरातून गुरुवारी, दि. ३० नोव्हेंबर रोजी पहाटेपासून भाविक एस.टी.द्वारे यात्रेसाठी जाणार आहेत. घटप्रभा कॅनॉल येथे माजी आमदार मालोजीराजे यांच्यातर्फे भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यानंतर जोगुळाभावी कुंड या ठिकाणी लिंब नेसण्याचा विधी होणार आहे. त्यानंतर भाविक सौंदत्ती डोंगर येथे दर्शनासाठी जाणार आहेत.ं

टॅग्स :cultureसांस्कृतिक