शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Kolhapur: जागतिक बँकेचे पथक पन्हाळ्यात; भूस्खलन प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 18:45 IST

भूस्खलनाच्या घटनांची तीव्रता कमी करण्यासाठीच्या उपाय योजनेवर चर्चा

पन्हाळा : पन्हाळा व परिसरात भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या घटना, त्यापासून होणाऱ्या अनेक प्रकारच्या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागणारी दक्षता व उपाय योजने बाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा अपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांचे सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अहवाल तयार करणार आहे. त्यासाठीची स्थळ पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेच्या पथकांने पन्हाळगडावर भूस्खलन प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी भेट दिली.भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या घटनांची तीव्रता कमी करण्याकरिता राबविले जाणारे प्रकल्प व उपायासाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पाहणी करण्यासाठी चारजणांचे पथक आले होते. जागतिक बॅंकेच्या पथकात बँक प्रमुख जोलांता वोटसन, पर्यावरण तज्ञ नेहा व्यास, दक्षिण आशिया अर्बन रेझीलीयंस सल्लागार जर्क गेल, जिल्हाअपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांचा समावेश होता. पथकाने मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलन व दरडी कोसळलेल्या ठिकाणांची पाहणी केली.पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे जाधव यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी सन २०१९ ते २०२१ या काळात झालेल्या भूस्खलन व दरडी कोसळलेल्या ठिकाणांची व झालेल्या नुकसानीची व त्यावेळी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर भूस्खलनाच्या घटनांची  तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. गडावरील पाण्याचा निचरा करणाऱ्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने, तसेच तटबंदीवर वाढलेली झाडे झुडपे ही दोन प्रमुख कारणे आहेत. यावर शिष्टमंडळाने उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.यावेळी कनिष्ठ भु वैज्ञानिक कोल्हापूर राहुल खंदारे, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता सचिन कुंभार, शाखा अभियंता अमोल कोळी, आर्किटेकट असोसिएशन अध्यक्ष अजय कोराणे, माजी उप नगराध्यक्ष चैतन्य भोसले, रविंद्र धडेल, रामानंद गोसावी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWorld Bankवर्ल्ड बँकlandslidesभूस्खलन