शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

जागतिक एडस दिन विशेष : ‘एडस’ येतोय नियंत्रणात, रुग्णांचे प्रमाण घटले, सकारात्मक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:36 IST

कोल्हापूर : गेल्या दहा पंधरा वर्षात एच.आय.व्ही(एडस) या आजाराने ठळकपणे नजरेत भरणारी रुग्णांची संख्या या दोन-चार वर्षात बरीचशी कमी आली आहे.जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांमुळे हा आजार नियंत्रणात येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. शुक्रवारी जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आशादायी आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे प्रयत्न नजरेत भरणारी रुग्णांची संख्या दोन-चार वर्षात बरीचशी कमी ‘एडस’नियंत्रणाच्या चळवळीत ५०० तरुणांची फौज‘संवेदना’तून ‘शून्य’ गाठण्याचा प्रयत्न

प्रवीण देसाई कोल्हापूर : गेल्या दहा पंधरा वर्षात एच.आय.व्ही(एडस) या आजाराने ठळकपणे नजरेत भरणारी रुग्णांची संख्या या दोन-चार वर्षात बरीचशी कमी आली आहे.

जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांमुळे भितीदायक असणारा व समाजापासून माणसाला तोडणारा हा आजार नियंत्रणात येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. शुक्रवारी जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आशादायी आहे.देशात महाराष्ट्र  व महाराष्ट्रात  मुंबई,पुणे, सांगली पाठोपाठ कोल्हापूरमध्ये एच.आय.व्ही.चे रुग्ण सर्वाधिक आढळले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एच.आय.व्ही.सह जगणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असण्यामध्ये सधनता, स्थलांतरीत कामगार, पर्यंटकांचे वाढलेले प्रमाण, सीमेलगतची भौगोलिक परिस्थिती व केंद्रीत लक्ष्यगट अशी विविध कारणे आहेत.

एडस सारख्या आजारामध्ये कोल्हापूरचे नाव राज्यात पहिल्या पाचमध्ये असणे हे शोभनीय नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

याची परिणीती म्हणजे २००७ मध्ये एच.आय.व्ही. संसर्गितांचे असणारे १०.०७ टक्के हे प्रमाण सध्या ०.९ टक्क्यांवर आले आहे. हे सकारात्मक चित्र आहे.

रुग्णांची संख्या कमी होण्यामागे आय.ई.सी. अंतर्गत शिक्षण, संवाद या बाबींचा मोलाचा सहभाग आहे. यामाध्यमातून आतापर्यंत विविध स्पर्धा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्ररथ, प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात एडस नियंत्रणासाठी २६ एकात्मिक समुपदेशन चाचणी (आय.सी.टी.सी) केंद्रे कार्यरत असून या ठिकाणी मोफत समुपदेशन व चाचणी केली जात आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व साधारणत: ७४ खासगी दवाखाने व प्रयोगशाळा या ठिकाणी एच.आय.व्ही.ची मोफत तपासणी केली जाते.

यामध्ये सामान्य लाभार्थी, गरोदर माता, क्षयरोग रुग्ण यांच्या चाचणीपूर्व समुपदेशनानंतर मोफत एच. आय.व्ही तपासणी केली जाते. यामध्ये जर एच.आय.व्ही.चा रुग्ण आढळल्यास त्याचे चाचणीपूर्व समुपदेशन करुन ए.आर.टी. केंद्राकडे पाठविले जाते.

रुग्णाने घ्यावयाचा आहार, घ्यावयाची काळजी आदीबाबत समुपदेशन करुन त्यांचे जीवनमान वाढवून त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘एडस’नियंत्रणाच्या चळवळीत ५०० तरुणांची फौज‘एडस’ आटोक्यात आणण्यासाठी एडस नियंत्रण विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून सुमारे ५०० महाविद्यालयीन तरुणांची फौज निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून महाविद्यालये व गावपातळीवर कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जाणार आहे.

‘संवेदना’तून ‘शून्य’ गाठण्याचा प्रयत्नसामाजिक बांधिलकीतून ‘संवेदना’ हा एडस जनजागृतीपर कार्यक्रम राबविला जात असून या माध्यमातून २०१४मध्ये ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’, २०१५मध्ये संवेदना चित्ररथ, २०१६मध्ये संवेदना वेध शून्य गाठण्याचा व २०१७मध्ये युवा संवेदना हे उपक्रम राबविले गेले.

 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एडस नियंत्रणात आणण्यात चांगले यश मिळाले आहे. हे प्रमाण शून्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न सुुुरु आहे. शासनाकडून निधी बंद झाला असला तरी वारांगणा सखी संघटना, तृतीय पंथीयांची मैत्रेय संघटना यांना सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रमात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न आहे.-दीपा शिपूरकर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर