शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप’च्या मुंबई मेळाव्यासाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:42 IST

कोल्हापूर : भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदानावर महामेळावा आज, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यासाठी गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता आणि ...

ठळक मुद्देविशेष रेल्वेची सुविधा : महिला, युवकांचा सहभाग; पक्षाकडून अल्पोपहार, पाण्याची सुविधा

कोल्हापूर : भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.

या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदानावर महामेळावा आज, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यासाठी गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता आणि साडेचार वाजता कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स येथून दोन विशेष रेल्वेतून कार्यकर्ते रवाना झाले. रेल्वे स्थानकावर दुपारी बारा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. तासभरात रेल्वे आणि स्थानकाचा परिसर त्यांच्या गर्दीने फुुलला. पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी स्थानक परिसर दुमदुमून गेला.

कार्यकर्त्यांच्या चेहºयावर उत्साह दिसून आला. कार्यकर्त्यांना रेल्वेतून रवाना करण्यासाठी येथे आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक किरण नकाते, हेमंत आराध्ये, वैशाली पसारे, प्रभा इनामदार, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, सुरेश जरग, आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले की, मुंबईतील या महामेळाव्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातून या मेळाव्यासाठी सुमारे दहा हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. या महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वे रवाना झालेल्या कार्यकर्त्यांना अल्पोपहार, पाण्याची सुविधा पक्षाने केली आहे. विशेष रेल्वेचे भाडेदेखील भरले आहे. यावेळी रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांनीही विशेष सहकार्य करीत, प्रवासी, कार्यकर्ते यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली.

रेल्वे विभागाकडून‘डेमू’ची चाचणीभाजपच्या महामेळाव्यासाठी कोल्हापूर आणि मिरज येथून रवाना होणाºया रेल्वे यांना अतिरिक्त डब्यांची गरज होती. त्यासाठी मध्य रेल्वे विभागाने सोलापूरहून दोन डीजेल मल्टिपल युनिट (डेमू) कोल्हापूर आणि मिरज येथे तात्पुरत्या स्वरूपात आणल्या. याद्वारे कोल्हापूर-मिरज शटल सर्व्हिस सुरू करण्याच्या अनुषंगाने ‘डेमू’ची चाचणीदेखील घेण्यात आली, असे स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूरसाठी तीन ‘डेमू’ मंजूर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल-दुुरूस्ती आणि चालकांला प्रशिक्षण देण्याची सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नाही. या सुविधेसाठी ६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूर-मिरज या मार्गावर शटल सर्व्हिसच्या माध्यमातून ‘डेमू’ धावण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, याबाबत पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, ‘डेमू’तील दोन रेल्वे या बारा आणि एक पंधरा बोगींची आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूरकरांची अनेक वर्षांपासूनची असलेली कोल्हापूर-मिरज मार्गावरील शटल सर्व्हिसची मागणी पूर्ण होईल.भाजपच्या मुंबईत होणाºया महामेळाव्यासाठी गुरुवारी कोल्हापुरातून कार्यकर्ते विशेष रेल्वेने रवाना झाले. यावेळी रेल्वेस्थानकावर भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, नचिकेत भुर्के, झाकीर जमादार, विजय आगरवाल, रेल्वेस्थानक प्रबंधक विजयकुमार, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाRailway Passengerरेल्वे प्रवासी