शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसचे कोल्हापुरात २३ व २४ आॅक्टोबरला कार्यकर्ता शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 10:48 IST

काँग्रेस पुन्हा एकदा घराघरांत पोहोचविण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या हेतूने कोल्हापुरात येत्या २३ व २४ आॅक्टोबरला जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० कार्यकर्त्यांची नोेंदणी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसचे कोल्हापुरात २३ व २४ आॅक्टोबरला कार्यकर्ता शिबिर पृथ्वीराज चव्हाणांची प्रमुख उपस्थिती, ६०० कार्यकर्त्यांची नोंदणी पूर्ण

कोल्हापूर : काँग्रेस पुन्हा एकदा घराघरांत पोहोचविण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या हेतूने कोल्हापुरात येत्या २३ व २४ आॅक्टोबरला जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० कार्यकर्त्यांची नोेंदणी झाली आहे.

फुलेवाडीच्या अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये होणाऱ्या या दोनदिवसीय शिबिरासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सोनल पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दिल्लीतून आठ कार्यकर्त्यांचा संच खास मार्गदर्शनासाठी येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिली.कॉँग्रेस कमिटीत आयोजित सेवादलाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पी. एन. पाटील यांनी सांगितले की, या शिबिरासाठी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-माजी नगरसेवक, तालुका व ब्लॉक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या सदस्यांना दोन दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर हे सर्वजण आपापल्या भागांत जाऊन, काँग्रेसची धोरणे सांगून विद्यमान सरकारची फसवणूक उघड करतील, असे या शिबिरामागचे धोरण आहे.केंद्र व राज्याच्या सरकारच्या कारभारावर आज एकही घटक समाधानी नसल्याचे सांगताना पी. एन. पाटील यांनी या सरकारने शेतकरी, कामगार, उद्योगाची वाताहत केल्याचे सांगितले. शाळा बंद पाडल्या, गोरगरिबांचे शिक्षण अडचणीत आणले. संपूर्णपणे देशाची वाताहत केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षच यातून मार्ग काढू शकतो, हा विश्वास कार्यकर्त्यांना देण्याची गरज आहे.

विरोधक सत्तेवर आल्यावर देश २० वर्षांनी मागे जातो, हा आजवरचा देशाचा इतिहास आहे. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. काँग्रेसने उंचीवर नेऊन ठेवलेला देश आज आर्थिक, सामाजिक अडचणीत सापडला आहे. देश नव्याने उभारण्यासाठी काँग्रेसने आता पुढाकार घेतला आहे. या शिबिरात हाच विचार मांडला जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर