शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ता एकनिष्ठतेसाठी दक्ष.. घरात नांदतायेत तीन-तीन पक्ष

By पोपट केशव पवार | Updated: April 19, 2024 16:53 IST

प्रमुख राजकीय घराण्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह

पोपट पवार कोल्हापूर : खरे तर राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या सोयीने भूमिका घेतात. वेळ पडेल तसे निर्णयही बदलत असतात. जिल्ह्यातील काही घराणी एकाच पक्षाची एकनिष्ठ राहत त्यांच्यातील एकीचे दर्शन देत असली तरी काही प्रमुख राजकीय घराण्यांमध्ये मात्र वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसते. लोकशाहीत प्रत्येकाला एक वैचारिक भूमिका असल्याने जो तो त्याच्या भूमिकेनुसार निर्णय घेत असेल. मात्र, एकाच घरावरील वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे कार्यकर्त्यांनाही बुचकाळ्यात टाकणारे ठरत आहेत.

काकी-पुतण्यांच्या वाटा वेगळ्याजिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी घट्ट पकड असलेल्या स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या घरात काकी-पुतण्याच्या वाटा वेगळ्या आहेत. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर या महाविकास आघाडीकडे असताना त्यांचे पुतणे संग्राम हे मात्र महायुतीच्या उमेदवारासाठी जीवाचे रान करत आहेत. विशेष म्हणजे संग्राम यांचे सख्खे बंधू रामराजेही शाहू छत्रपती यांच्यासाठी चंदगड तालुका पालथा घालत आहेत.

रेडेकर माय-लेक कुणीकडे?गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर या काँग्रेसच्या एकनिष्ठ असून त्या शाहू छत्रपती यांच्यासाठी लढत आहेत. त्यांचे चिरंजीव अनिरुद्ध मात्र शिंदेसेनेच्या मांडवाखाली आहेत. विशेष म्हणजे रेडेकर यांचे भाचे सुनील शिंत्रे हे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख असून ते महाविकासच्या प्रचारात सक्रिय आहेत.

सासरे महायुतीत, जावई महाविकासकडेगोकुळचे संचालक अंबरिश घाटगे हे कागल तालुक्यातील महाविकास आघाडीची धुरा संभाळत आहेत. या माध्यमातून ते महायुतीच्या नेत्यांना थेट अंगावर घेत असताना दुसरीकडे त्यांचे सासरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले मात्र महायुतीच्या प्रत्येक सभा, नियोजनाच्या बैठकांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात.

एक नरके महायुतीत, दुसऱ्यांची भूमिका कळेनामाजी आमदार चंद्रदीप नरके यांनी युतीधर्म पाळत संजय मंडलिक यांच्यामागे ताकद उभी केली आहे. मात्र, त्यांचे चुलत बंधू गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी लोकसभेच्या आखाड्यातून माघार घेतली असून ते दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार आहेत.

गडहिंग्लजच्या चव्हाण चुलते-पुतण्यांचा मार्ग वेगळागडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण हे महायुतीची विचारधारा घरोघरी पोहोचवत असताना त्यांचे पुतणे पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण मात्र महाविकास आघाडीची खिंड लढवत आहेत.

मामा महाराजांकडे, भाचा संभाळताेय मेहुण्याची बाजूचंदगड तालुक्यात पै-पाहुण्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे आमदार राजेश पाटील यांचे मेहुणे असल्याने ते मेहुण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे आमदार पाटील यांची सख्खी आत्या ही काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांना दिली आहे. मात्र, या तालुक्यात गोपाळराव पाटील यांच्याकडेच महाविकास आघाडीची धुरा आहे.

मेहुणे-पाहुणे पुन्हा विरुद्ध दिशेलाबिद्रीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले के.पी.पाटील व ए.वाय.पाटील हे मेहुणे-पाहुणे लोकसभा निवडणुकीतही आमनेसामने आहेत. के.पी.हे महायुतीचा धर्म पाळण्यासाठी मंडलिक यांची संगत करत असताना ए.वाय. यांनी मात्र, महाविकास आघाडीची वाट निवडली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४