शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या मास्टर प्लॅनला 'सतरा विघ्नं! निविदा प्रक्रियेतच अडकले घोडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:17 IST

सुधारित शहर विकास आराखड्याचे काम तब्बल दोन वर्षे रेंगाळले

भारत चव्हाणकोल्हापूर : शहराचा विकास पुढील वीस वर्षांत कशा पद्धतीने करावा, या दृष्टीने तयार केल्या जाणाऱ्या सुधारित शहर विकास आराखड्याचे काम तब्बल दोन वर्षे रेंगाळले असून, पुढील एक वर्ष तरी त्याच्या कामाला सुरुवात होणार नाही. ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नं’ असं म्हणतात तसंच या विकास आराखड्याचे झाले आहे. तो तत्काळ पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी सुरू व्हावी, असे कोणालाही वाटत नसल्याने त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोल्हापूर शहराचा दुसरा सुधारित विकास आराखडा १९९९ रोजी पूर्ण होऊन २००० सालापासून अंमलबजावणी झाली. शहराचा विकास सुनियोजित व्हावा, नागरिकांना चांगल्या सार्वजनिक सुविधा मिळाव्यात, त्यांचा त्यांना लाभ घेता यावा, आरक्षित जागांचा विकास कधी आणि कशा प्रकारे करावा याचे संपूर्ण नियोजन या आराखड्यात केलेले असते.गेल्या वीस वर्षांत दुसऱ्या सुधारित शहर विकास आराखडा किती टक्के पूर्णत्वास गेला हा संशोधनाचा विषय आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन तिसरा सुधारित आराखडा रखडून ठेवून विकासामागील उदासीनता स्पष्ट केली आहे.२०१९ वर्ष संपत असताना कामाला सुरुवात व्हायला पाहिजे होती. तोपर्यंत २०२० मध्ये कोरोनासारखी महामारी आली. त्यात गेल्या दीड वर्षापासून काम रखडले. कोरोना कमी होऊन निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी केली जात होती. पाच वेळा निविदा प्रक्रिया राबविली गेली. काम करण्यास कोणी ठेकेदार मिळाला नाही. आता सहाव्यांदा निविदा जाहीर होणार तोवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले. पुन्हा त्यावर काम झाले. निविदा प्रक्रियाची कागदपत्रे, आराखडे नगररचना उपसंचालक यांच्याकडे छाननीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून छाननी पूर्ण झाल्यावर हे काम अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे जाणार आहे. समितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रसिद्ध होईल.२०२३ साल उजाडणार समितीची मान्यता मिळण्यास किमान एक महिना, तर तेथून पुढे विकास आराखडा तयार करण्यास एक वर्ष लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ २०२३ सालापर्यंत तरी शहराचा विकास आराखडा पूर्ण होणार नाही, असे दिसते.उत्साहापेक्षा उदासीनताच अधिक - सभागृहाचे अस्तित्व नसल्यामळे अधिकाऱ्यांच्या मागे लागणार कोण? हा प्रश्न आहे. 

- दैनंदिन कामाचा वर्कलोड लक्षात घेता आराखडा तयार करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. ही उदासीनता शहराच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर