शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कोल्हापुरात सारथीच्या १३० कोटींच्या इमारतीचे काम जोरात

By भीमगोंड देसाई | Updated: April 25, 2025 18:46 IST

अकरापैकी ६ मजल्यांचे स्लॅब पूर्ण : राजाराम महाविद्यालय परिसरात बांधकाम

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालय परिसरात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राची १३० कोटी ५५ लाखांची ११ मजली भव्य इमारतीचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पाचशे मुले आणि तितक्याच मुलींसाठी अत्याधुनिक सेवा, सुविधायुक्त इमारत बांधली जात आहे. एकूण अकरापैकी आतापर्यंत सहा मजल्यांची स्लॅब पडले आहे. मार्च २०२६ नंतर पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा या इमारतीच्या मंजुरीच्या कामात, निधी उपलब्ध करून देण्यात मोठा वाटा राहिला आहे.मराठा समाज आरक्षणासाठी वारंवार आक्रमक होत आहे. त्याची दखल घेऊन शासनाने राज्यातील मराठा, मराठा - कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाठी काम करण्यासाठी पुणे येथे सारथी संस्थेची स्थापना जून २०१८ मध्ये स्थापन झाली. याचे उपकेंद्र २६ जून २०२१ पासून कोल्हापुरात सुरू आहे. उपकेंद्रासाठी शासनाने चार एकर जमीन शासनाने दिले. त्यावर फेब्रुवारी २०२४ पासून इमारत बांधकामचे काम पुण्यातील ठेकेदार कंपनी करीत आहे.

मराठा आंदोलनामुळे..मराठा समाज वारंवार आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. म्हणून या समाजातील विद्यार्थ्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास सारथी संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. आरक्षण मागणीची तीव्रताही या संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे.

बांधकामाचे क्षेत्र - चौरस मीटरमध्ये

  • उपकेंद्राचे प्रशासकीय इमारत : ६६२८.३८
  • संग्रहालय, अभ्यासिका : ६१४९.४४
  • मुलांचे वसतिगृह : ११४३३.७७
  • मुलींचे वसतिगृह : १२३३२.८२
  • भोजनगृह : २०४.८०
  • इमारतीचे एकूण बांधकाम : ३६७४९.२०

२२ कोटींवर खर्चमंजूर निधीपैकी २२ कोटी १५ लाख ४२ हजारांची शासनाकडून प्राप्त पैसे खर्च झाले आहेत. प्रलंबित देयके देण्यासाठी १५ कोटी निधीची आवश्यकता आहे. काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही वास्तू पूर्ण झाल्यावर तिथे विद्यार्थ्यांना कशा उत्तम सेवा-सुविधा देता येतील, असा आमचा प्रयत्न आहे. - किरण कुलकर्णी, सहव्यवस्थापकीय संचालक सारथी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर