शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कसबा बावडा रिंगरोडचे काम रेंगाळले, ७ वर्षांपासून भिजत घोंगडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:49 IST

वाहतुकीची प्रचंड कोंडी

रमेश पाटीलकसबा बावडा : कसबा बावडा मुख्य रस्त्यावरील सकाळ व संध्याकाळच्या वेळी होणारी वाहतुकीची कोंडी टाळायची असेल तर खानविलकर पेट्रोलपंप ते श्रीराम पेट्रोलपंप या पाच किलोमीटर लांबीच्या पंचगंगा नदीकाठाने होणाऱ्या रिंगरोडचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे. तशी मागणी आता बावड्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे. मात्र, गेल्या ७ वर्षांपासून या रेंगाळलेल्या रिंगरोडची केवळ चर्चाच होत आली आहे.

बावड्यातील भगवा चौक ते पिंजार गल्ली या मार्गावर सकाळ व सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी ही नित्याची झाली आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामावेळी तर वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या जेव्हा या मार्गावरून जातात तेव्हा त्यांच्या पाठीमागून येणारी वाहने अक्षरशः कासव गतीने पुढे सरकत असतात. मुख्य रस्त्यावर पाण्याचा हात चौकात, तर सणावारावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.वाहतुकीच्या कोंडीमुळे या मार्गावर लहान-मोठे अपघात तर वारंवार होत असतात. दिवसातून एकदा तरी या मार्गावर सरासरी एक-दोन अपघात झालेले पहावयास मिळतात. वाहतुकीची कोंडी होते व लहान-मोठे अपघात होतात तेव्हा बावड्याच्या रिंगरोडची चर्चा ऐरणीवर येते. या रस्त्यासाठी जमिनी जाणार असलेल्या शेतकऱ्यांना टीडीआर किंवा रोख रक्कम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी त्याचा मोबदलाही घेतला आहे.

असा आहे प्रस्तावित रस्ता..

जयंती नाल्याजवळील खानविलकर पेट्रोलपंप येथून या प्रस्तावित रिंगरोडला नदीकाठावरून सुरुवात होते. हा रस्ता १०० फुटी आहे. न्यू पॅलेस, शासकीय धान्य गोडाऊन, पवार मळा, राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या पाठीमागून हा रस्ता पुढे जातो. बावड्यातील राजाराम बंधारा येथील दत्त मंदिरासमोरून तसेच स्मशानभूमीच्या बरोबर मधून तसेच पुढे गोळीबार मैदानातून जाऊन श्रीराम पेट्रोलपंपाजवळ मुख्य रस्त्याला मिळतो.

वाहतुकीसाठी उत्तम पर्याय..

कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा रस्त्याची ओळख आहे. मात्र, हा रस्ता बावड्यातील अतिक्रमण व अवास्तव पार्किंग यामुळे वाहतुकीला अडचणीचा ठरतो. त्यामुळे बावड्याला रिंगरोड झाल्यास बावड्यात होणारी वाहतुकीची कोंडी टळेल आणि रिंग रोडमुळे अवजड वाहनांना वाहतुकीसाठी उत्तम पर्यायही मिळेल.

७० टक्के जमिनी ताब्यात..कसबा बावडा रिंगरोडसाठी शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७० टक्के जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनींच्या मोबदल्यात त्यांना टीडीआर दिला आहे. ३० टक्के शेतकऱ्यांनी अद्याप जमिनी महापालिकेच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. याबाबत ८४/४ विकास नियंत्रण नियमानुसार नोटिसा पाठवल्या होत्या. पण शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिंगरोडचे काम ठप्प आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावर या कामाला सुरुवात होईल. -हर्षजित घाटगे, शहर अभियंता, महानगरपालिका, कोल्हापूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक