शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई भक्तनिवासाचे काम रखडले.. जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:45 IST

सहा महिन्यांची डेडलाइन: सहा वर्षे काम रेंगाळले

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ताराबाई रोडवर सुरू असलेल्या भक्तनिवासचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. या कामात सातत्याने काॅन्ट्रॅक्टरकडून दिरंगाई केली जात असल्याने बुधवारी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी पुढील सहा महिन्यांत इमारत तयार झाली पाहिजे, असा दमच भरला.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने खरेदी केलेल्या महालक्ष्मी बँकेच्या जागेवर सात मजली इमारती बांधली जात आहे. पहिले तीन मजले पार्किंगसाठी आणि वरचे चार मजले भक्त निवास करण्यात येत आहे. यासाठी साधारण साडेतीन कोटींचा निधी दिला असून याचा ठेका पॅराडाईज डेव्हलपरला देण्यात आला आहे. सन २०१९ मध्ये ठेका दिला गेला. त्यानंतर कोरोनामध्ये दोन वर्षे गेली. पण कोरोना संपूनही चार वर्षे झाली तरी ठेकेदाराने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. यापूर्वी देवस्थान समितीने वारंवार ठेकेदाराला नोटिसा पाठवल्या आहेत. पण त्याचाही परिणाम झालेला नाही. अखेर बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी देवस्थानचे अभियंता व ठेकेदाराला बोलावून काम कुठपर्यंत आले आहे याची विचारणा केली व पुढील सहा महिन्यात इमारत पूर्ण झाली पाहिजे, अशी डेडलाइनच दिली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांचे तरी ठेकेदार ऐकतात का ते पाहावे लागेल.