शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम, पण काम कोणते द्यायचे हाच प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 17:59 IST

पन्नाशी ओलांडल्याने संगणकाचे आणि ऑनलाइन कामासाठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने यांना वर्क फ्राॅम होमवेळी कोणते काम द्यायचे, असे प्रश्नचिन्ह येथील पोलीस दलासमोर आता निर्माण झाले आहे.

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग गतीने होत असल्याने गृह विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार शहर आणि जिल्ह्यातील ५५ वर्षांवरील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम योजनेचा लाभ होऊ शकतो. पन्नाशी ओलांडल्याने संगणकाचे आणि ऑनलाइन कामासाठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने यांना वर्क फ्राॅम होमवेळी कोणते काम द्यायचे, असे प्रश्नचिन्ह येथील पोलीस दलासमोर आता निर्माण झाले आहे. पण शासनाचा आदेश असल्याने याची अंमलबजावणी करावी लागेल, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.

नव्या विषाणूमुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. याची पोलिसांना लागण होऊ नये, यासाठी गृह विभाग सतर्क झाला आहे. ५५ वर्षांवरील पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून यांना घरातून काम करण्याची मुभा शासनाने दिली आहे. पण यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अडचणीचे ठरणार आहे.सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षाला आहे. त्यामुळे ५५ वर्षे पूर्ण झालेले बहुतांशी पोलीस सेवानिवृत्तीच्या मूडमध्ये असतात. घरातून ऑनलाइन काम करण्यासाठीचे परिपूर्ण संगणक ज्ञान त्यांच्यात नाही. यामुळे यांना घरात बसून काम करण्यासारखे कोणते काम आहे, याची माहिती प्रशासन घेत आहे. अशाप्रकारचे काम नसेल तर वर्क फ्रॉम होम केवळ कागदावरच राहणार आहे.

जिल्ह्यातील पोलिसांचे संख्याबळ

एकूण पोलीस : २९२१

अधिकारी : १५९

पोलीस : २७६२

५५ वर्षांवरील महिला पोलीस : ६

५५ वर्षांवरील पुरुष पोलीस :१६८

विभाग हायटेक; पण

पोलिसांची बहुतांशी कामे जनतेशी थेट संपर्काचीच असतात. तरीही अलीकडे पोलीस विभाग हायटेक झाल्याने काही कामे ऑनलाईन होत आहेत. सायबर कक्षातून ऑनलाइन काम केले जाते. येथे संगणक आणि तंत्रज्ञानाची माहिती असणारे पोलीस काम करतात.

या कक्षातून होणारी काही कामे घरातून करता येण्यासारखी आहेत. पण ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘सायबर’मध्ये चालणारे काम करण्यासाठीचे ज्ञान नाही. हीच खरी अडचण नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीवेळी येणार आहे.

कोरोनाच्या यापूर्वीच्या लाटेत ५५ वर्षांवरील पोलिसांना थेट जनतेशी संपर्क येणार नाही, असे कार्यालयीन काम दिले होते. आता सरकारने नुकतेच घेतलेल्या निर्णयानुसार वर्क फ्रॉम होम जिल्ह्यातील १७४ पोलिसांना लागू होऊ शकते. - प्रिया पाटील, उपअधीक्षक (गृह)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस