लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरुळ : स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांची समाजसेवेची परंपरा ‘लोकमत’ परिवाराने कायम ठेवत निर्भीड पत्रकारितेबरोबरच सामाजिक कामाच्या माध्यमातून समाजमनावर ठसा उमटवला आहे. रक्तदान माेहिमेतून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केल्याचे गौरवोद्गार शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी काढले.
‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत सांगरुळ (ता. करवीर) येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे होते. यावेळी ५३ जणांनी रक्तदान केले. सरपंच सदाशिव खाडे म्हणाले, ‘लोकमत’ने नेहमीच चांगल्या कामाला प्रेरणा देत कौतुकाची थाप मारण्याचे काम केले. रक्तदान शिबिराचे आयोजन हे प्रेरणादायी आहे. रक्तदान उपक्रमाबाबत ‘लोकमत’चे बातमीदार राजाराम लोंढे यांनी माहिती दिली. ‘लोकमत’चे मनुष्यबळ व प्रशासन व्यवस्थापक संतोष साखरे, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष निवास वातकर, उपसरपंच सुशेंद्र नाळे, निवृत्ती संघाचे संचालक दीपक घाेलपे, यशवंत बँकेचे माजी उपाध्यक्ष दिलीप खाडे, ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर, खाटांगळेचे सरपंच सतीश नाईक, नानासाहेब कासोटे, आनंदा नाळे, आनंदराव कासोटे, प्रा. तुकाराम जंगम, सर्जेराव नाळे, प्रकाश गाताडे, प्रशांत नाळे, सचिन दशरथ नाळे, पोपट मंडगे, व्ही. के. नाळे, अनिल घराळ, स्वप्निल नाळे, सुनील खाडे, अविनाश चौगले, सिद्धार्थ म्हेत्तर आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे बातमीदार मच्छिंद्र मगदूम यांनी आभार मानले.
रघुनाथ पाटील यांचे ७१ वे रक्तदान (फाेटो-११०७२०२१-कोल-रघुनाथ पाटील)
खाटांगळे येथील रघुनाथ प्रभाकर पाटील यांनी ‘लोकमत’च्या शिबिरात ७१ वे रक्तदान करून शतकाकडे वाटचाल सुरू ठेवली. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या मोहिमेचे कौतुक करत रक्तदान हे पवित्र दान असल्याने आपण स्वेच्छेने प्रत्येक ठिकाणी रक्तदान करत असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत जंगम यांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार (फोटो-११०७२०२१-कोल-चंद्रकांत जंगम)
‘लोकमत’ रक्तदान माेहिमेचा ‘लोगो’ तयार करून चंद्रकांत जंगम यांनी गावात विविध ठिकाणी लावून रक्तदानाचे आवाहन केले. याबद्दल ‘लोकमत’च्या वतीने आमदार आसगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. काेरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक दीपक नामे व एस. ए. कोटकर यांचा सत्कारही करण्यात आला.
फोटो ओळी : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत सांगरुळ (ता. करवीर) येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मच्छिंद्र मगदूम, प्रशांत नाळे, राजाराम लोंढे, संतोष साखरे, सुशेंद्र नाळे, सदाशिव खाडे, दीपक घोलपे, धनाजी घुंगूरकर, अनिल घराळ उपस्थित होते. (फाेटो-११०७२०२१-कोल-सांगरुळ) (छाया- सुनील खाडे)