शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शब्दप्रधान गायकीचा उपासक...कोल्हापूरकरांनी दिल्या यशवंत देव यांच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:24 IST

गीतकार, संगीतकार यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकीचे उपासक. शब्दांमागे दडलेला भावार्थ, रसिकांच्या मनाला भिडेल अशा संगीतासाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. कोल्हापुरात त्यांच्या सुगम संगीताच्या मैफली गाजल्या. येथील संगीत क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांशी त्यांचा जवळचा स्नेह होता. काही वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठातही त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देशब्दप्रधान गायकीचा उपासक...कोल्हापूरकरांनी दिल्या यशवंत देव यांच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर : गीतकार, संगीतकार यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकीचे उपासक. शब्दांमागे दडलेला भावार्थ, रसिकांच्या मनाला भिडेल अशा संगीतासाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. कोल्हापुरात त्यांच्या सुगम संगीताच्या मैफली गाजल्या. येथील संगीत क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांशी त्यांचा जवळचा स्नेह होता. काही वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठातही त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.भातुकलीच्या खेळामधली, या जन्मावर या जगण्यावर, जीवनात ही घडी अशीच राहू दे, दिवस तुझे हे फुलायचे, येशील येशील राणी...अशा अवीट गोडीच्या गीतांचा नजराणा देणारे संगीतकार, गीतकार कवी यशवंत देव यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीतातला देव हरवला, अशा शब्दांत मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.यशवंत देव यांचा कोल्हापूरशी संबंध विविध कार्यक्रम आणि कार्यशाळेच्या निमित्ताने आला. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या दोन दिवसीय सुगम संगीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. अभिरुची संस्थेच्यावतीने वसंतराव देशपांडे स्मृती संगीत स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त संस्थेने १५-१६ वर्षांपूर्वी यशवंत देव यांच्या गाण्यांचा कार्यक्रम घेतला होता व त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरणही झाले.बासरीवादक सचिन जगताप यांच्याशी यशवंत देव यांचा विशेष स्नेह होता. जगताप यांनी देव यांच्या पुण्यातील एका व कोल्हापुरातील एका मैफलीत बासरीवादन केले होते. या निमित्ताने जगताप यांना यशवंत देव यांचा सहवास लाभला. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाण्याचा योग आला.

उपजत कविमन असल्याने ते रोजच्या घटनांवर विडंबन कविता करायचे. प्रवासातही मिश्कीली सुरू असायची. गाण्यात नवनवीन प्रयोग सुरू असायचे आणि ते कॅसिनोवर वाजवायचे. एका मैफलीत गायक व्यवस्थित गात नव्हता, तर त्यांनी गायकाला काही सूचना करून पुन्हा गायला लावले, त्या गाण्याला रसिकांची विशेष दाद मिळाली, अशी आठवण जगताप यांनी सांगितली.गायन समाज देवल क्लबच्या नूतनीकरणासाठी संस्थेला मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात यशवंत देव यांच्या हस्ते २ लाखांचा धनादेश देण्यात आला होता. दत्ता डावजेकर फौंडेशनच्या वतीने २००८-०९ च्या दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात स्मृतीगंध लिसनर्स क्लबला प्रमोटिंग लाईट म्युजिक अ‍ॅन्ड सिनेसंगीत या कार्यासाठी देव यांच्या हस्ते अंबाबाईची मूर्ती देऊन गौरविण्यात आले होते. विनय डावजेकर, श्रीकृष्ण कालगावकर, प्रभाकर तांबट, धनंजय कुरणे, ‘लोकमत’चे तत्कालीन संपादक राजा माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.

 

मराठी भावसंगीतातला मोठा संगीतकार, गीतकार आपल्यातून हरपला आहे. त्यांच्या गीतांच्या चाली वरवर सोप्या वाटत असल्या तरी, त्या गायला कठीण असायच्या. भावसंगीतात त्यांनी शब्दप्रधान गायकी रूढ केली.श्रीकांत डिग्रजकर (गायन समाज देवल क्लब)

वसंतराव देशपांडे स्मृती संगीत स्पर्धेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात माझा यशवंत देव यांच्याशी संपर्क आला. त्यांची ही मैफल त्यावेळी खूप गाजली होती. रसिकांचे प्रेम आणि गाणे या पलीकडे त्यांना काहीच महत्त्वाचे नव्हते, अगदी पैसासुद्धा.प्रसाद जमदग्नी (अभिरुची नाट्यसंस्था)

मी यशवंत देव यांच्या दोन मैफलींमध्ये बासरीवादन केले. सादरीकरणादरम्यान त्यांचे प्रत्येक कलाकारावर बारीक लक्ष असायचे. प्रसंगानुरूप लगेच संगीताची चाल बदलायचे आणि त्याची माहिती वादकांना द्यायचे इतकी लवचिकता आणि रसिक मनाचा अभ्यास त्यांनी केला होता.सचिन जगताप (बासरीवादक) 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर