शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ड्रेनेजच्या कामासाठी महिलांचा ‘रास्ता रोको’, मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:34 IST

शिवाजी पेठेतील वाळके हॉस्पिटलशेजारी ड्रेनेज तुंबून मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, म्हणून संतप्त महिलांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केले.परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा उपद्रव वाढला आहे. परिसरात तापाचे तीन ते चार रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देअचानक रास्ता रोको झाल्याने वाहनधारकांची तारांबळ स्थानिक नगरसेवक अजिंक्य चव्हाण घटनास्थळी ड्रेनेज दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील वाळके हॉस्पिटलशेजारी ड्रेनेज तुंबून मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, म्हणून संतप्त महिलांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते जुना वाशी नाका या मार्गावर वाळके हॉस्पिटलजवळील ड्रेनेज तुंबल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा उपद्रव वाढला आहे. परिसरात तापाचे तीन ते चार रुग्ण आढळून आले आहेत.

ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी महिलांनी सकाळी दहा वाजता अचानक रास्ता रोको आंदोलन केले. ऐन गर्दीच्या वेळी अचानक रास्ता रोको झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

‘रास्ता रोको’ची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक अजिंक्य चव्हाण हे घटनास्थळी गेले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या महिलांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी ड्रेनेज दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनात अपर्णा मोरे, मनीषा ठोंबरे, स्वाती निकम, अनुराधा मोरे, मेघा थोरात, स्नेहल पोवार, संयोगिता पोवार, सारिका मोरे, उषा शिंदे, सुनीता शिंदे, अर्चना पाटील, माधुरी धरपणकर यांनी भाग घेतला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा