शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिला काँग्रेसतर्फे गॅस दरवाढविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 19:52 IST

Congress Kolhapur : गॅस, पेट्रोल, डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, महागाई विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने चुलीवर जेवण बनवून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, खाद्यतेल, डिझेल-पेट्रोलचे दर कमी झालेच पाहीजे, मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देमहिला काँग्रेसतर्फे गॅस दरवाढविरोधात आंदोलन

कोल्हापूर : गॅस, पेट्रोल, डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, महागाई विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने चुलीवर जेवण बनवून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, खाद्यतेल, डिझेल-पेट्रोलचे दर कमी झालेच पाहीजे, मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.काँग्रेस कमिटीसमोर झालेल्या या आंदोलनानंतर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरलाताई पाटील म्हणाल्या, यांनी मै देश बिकने नहीं दूंगा म्हणणोरे मोदी देश विकायला निघाले आहेत, उज्वला गॅस योजना देवून सिलिंडर महाग केला आणि महिलांना पुन्हा चुलीपुढे आणून ठेवले.

भाज्या, तेल, जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढवले, महिलांचे आर्थिक गणित कोलमडले असून याचा आम्ही निषेध करतो. निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनशुन्य व चुकीच्या धोरणांमुळे गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा त्रास घराघरातील महिलांना होत असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महिलाध्यक्षा संध्या घोटणे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, शुभांगी साखरे, हेमलता माने, वैशाली महाडीक यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर