ट्रकच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 05:34 AM2020-03-04T05:34:25+5:302020-03-04T05:34:27+5:30

मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली.

Women killed in truck collision | ट्रकच्या धडकेत महिला ठार

ट्रकच्या धडकेत महिला ठार

Next

कोल्हापूर : मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली. अंकिता कैलास पोवार (वय ४५, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. शाहूपुरी पोलिसांनी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुजावर (रा. माळी कॉलनी, टाकाळा) याला अटक केली.
पोलिसांनी सांगितले, अंकिता पोवार यांचे पती शिरोली एमआयडीसीमध्ये खासगी नोकरी करीत होते. ते दारूच्या आहारी गेल्याने नोकरी सोडून घरीच असतात. या दोघांना दोन मुले आहेत. मुलगा विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मुलगी नववीमध्ये शिकते. त्यामुळे घरची जबाबदारी आणि उदरनिर्वाह चालविण्यासाठी अंकिता पोवार या मार्के टयार्ड येथील एका कंपनीत नोकरी करीत होत्या. नेहमीप्रमाणे त्या मंगळवारी सकाळी बसने मार्केट यार्ड बसस्थानक येथे उतरल्या. रस्ता ओलांडताना त्यांना ट्रकने धडक दिली.

Web Title: Women killed in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.