शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालविकास अधिकारी महाडिक रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:01 IST

कोल्हापूर शहर महिला बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक रजेवर गेल्या आहेत. या महिनाअखेरपर्यंत वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी म्हणणे दिले असले तरी साडी खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त होताच त्या रजेवर गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देमहिला बालविकास अधिकारी महाडिक रजेवरसाडी खरेदी प्रकरणाची चौकशी सुरु : रसाळ यांच्याकडे कार्यभार

कोल्हापूर : कोल्हापूर शहर महिला बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक रजेवर गेल्या आहेत. या महिनाअखेरपर्यंत वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी म्हणणे दिले असले तरी साडी खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त होताच त्या रजेवर गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

साहाय्यक आयुक्त कार्यालयाकडूनच त्यांच्याकडील पदभार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, महाडिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला: पण होऊ शकला नाही.या संदर्भात साहाय्यक आयुक्त नितीन मस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रजा मंजूर केली असल्याचे सांगून कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिल्याचे सांगितले. साडी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांची जुलैमध्ये पुण्याला साहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली. या पदाचा अतिरिक्त कार्यभार महाडिक यांच्याकडे देण्यात आला होता. तोदेखील त्यांनी स्वीकारला नाही. साडी खरेदी प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नुकतेच चौकशीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडून हे पत्र हातात मिळाल्यावर लगेचच त्यांनी वैद्यकीय रजा टाकून पुण्याला जाण्याचा मार्ग निवडला. २४ ऑगस्ट ते ३० सप्टेबरपर्यंत अशी वैद्यकीय रजा मंजूर करून घेतली आहे. त्यांचा कार्यभार करवीरच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे देण्यात आला.

पण हा कार्यभारही बदलून जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्याकडे देण्यात आला. रसाळ यांच्याकडे आधीच सात कामांचा अतिरिक्त कार्यभार आहे. कोविड ड्यूटीचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे.नेमके काय प्रकरण..महाडिक यांनी वर्षभरापूर्वी कोल्हापूर शहर महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा कार्यभार घेतला. अंगणवाडी कर्मचारी साडी वाटप, शालेय पोषण आहार वाटप यावरून संघटनासोबत त्यांचे खटके उडाले होते. हलक्या दर्जाच्या साड्या जास्त किमतीने खरेदी करून त्या अंगणवाडी सेविकांच्या माथी मारल्याची तक्रार आहे. त्याच्या चौकशीची मागणी अंगणवाडी कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेकडे केली होती.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर