शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

महिला असुरक्षितच!, बलात्कार, अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ; कोल्हापूर परिक्षेत्रातील आकडेवारीवरून स्पष्ट

By उद्धव गोडसे | Updated: February 19, 2024 16:47 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेबद्दल विविध उपाययोजना आणि त्याचा गाजावाजा सुरू असला, तरी प्रत्यक्षात मात्र महिला असुरक्षितच असल्याचे ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेबद्दल विविध उपाययोजना आणि त्याचा गाजावाजा सुरू असला, तरी प्रत्यक्षात मात्र महिला असुरक्षितच असल्याचे चित्र गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात महिलांशी संबंधित असलेले पाच हजार ८०८ गंभीर गुन्हे नोंद झाले. यात ७५ महिलांचा खून झाला असून, ११२७ महिला बलात्काराची शिकार बनल्या. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महिला आणि मुली सुरक्षित राहाव्यात, त्यांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी, घरात आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडूनही निर्भया पथक, महिला दक्षता पथक, दामिनी पथक असे अनेक उपक्रम राबवले जातात. यानंतरही महिलांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या वाढतच आहे.कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात महिलांशी संबंधित असलेल्या पाच हजार ८०८ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारात सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण जिल्हे पुढे आहेत. सातारा आणि सांगली जिल्ह्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या काहीशी कमी आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये महिलांचे खून, खुनाचे प्रयत्न आणि अपहरणाच्या गुन्ह्यात घट झाली. मात्र, बलात्कार, बाललैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली.

विनयभंग वाढलेगेल्या वर्षभरात २०२२ च्या तुलनेत विनयभंगाचे २४६ गुन्हे वाढले. बाललैंगिक अत्याचाराचे ४९, तर बलात्काराचे ९४ गुन्हे वाढले. अपहरणाचे १५५ गुन्हे घटले. खून आणि खुनाच्या गुन्ह्यातही किंचित घट झाली.

महिलांचे खून - ७५जिल्हा - दाखल - उघडकोल्हापूर - १२ - १२सांगली - १३ - १३सातारा - ११ - ६सोलापूर ग्रामीण - २४ - २२पुणे ग्रामीण - १५ - १२

बलात्कार - ११२७जिल्हा - दाखल - उघडकोल्हापूर - १९८ - १९८सांगली - १६५ - १६४सातारा - १७० - १४१सोलापूर ग्रामीण - २६७ - २६४पुणे ग्रामीण - ३२७ - ३२७

बाललैंगिक अत्याचार - ७३६जिल्हा - दाखल - उघडकोल्हापूर - १३६ - १३६सांगली - १०६ - १०५सातारा - १२२ - १०३सोलापूर ग्रामीण - १७६ - १७४पुणे ग्रामीण - १९६ - १९६

विनयभंग - २४४६जिल्हा - दाखल - उघडकोल्हापूर - ४४० - ४३७सांगली - ३१४ - ३१०सातारा - ३७६ - २४८सोलापूर ग्रामीण - ५३६ - ५३३पुणे ग्रामीण - ७८० - ७७६

अपहरण - १३५५जिल्हा - दाखल - उघडकोल्हापूर - १९६ - १६६सांगली - २३० - ११३सातारा - २२२ - १४०सोलापूर ग्रामीण - २४५ - २०७पुणे ग्रामीण - ४६२ - ३२६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी