शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये चढताना महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 20:00 IST

आयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंग रोडवर केमटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले.

कोल्हापूर : आयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंग रोडवर केमटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु ते धूम स्टाईलने पसार झाले. अधिक माहिती अशी, शिला गजानन निकम (वय ५५, रा. शाहुपुरी पाचवी गल्ली) ह्या रविवारी सकाळी आयोध्या कॉलनी, फुलेवाडी येथे राहणारी मुलगी रुपाली अजित जाधव यांच्याकडे गेल्या होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परत जाण्यासाठी त्या रिंग रोडवरील बसस्टॉपवर उभ्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ 22 वर्षांचा अनोळखी तरुण येऊन उभा राहिला. बराच वेळ तो उभा असलेने निकम यांना शंका आली. त्यांनी तू महिलांच्या जवळ का थांबून आहेस, निघून जा असे म्हणाल्या. त्यावर त्याने रंकाळ्यावर निघालोय, बसची वाट पाहत आहे, असे सांगितले.काही वेळाने बोंद्रेनगरहून मध्यवर्ती बसस्थानकडे जाणारी केएमटी बस आली. निकम बसमध्ये चढत असताना त्या तरुणाने त्यांच्या गळ्यात हात घालून गंठण हिसकावून घेतले. यावेळी निकम यांनी एका हाताने गंठण धरल्याने ते अर्धवट तुटून चोरट्याच्या हाती लागले. चोर..चोर म्हणून त्यांनी आरडाओरड करताच संबंधित तरुण बसपासून काही अंतर पुढे धावत गेला. समोर दुचाकीवरून तरुण वाट पाहत थांबला होता. त्यावर बसून दोघे जण धूमस्टाईलने रंकाळ्याच्या दिशेने पसार झाले. काही नागरिकांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला असता ते मिथून आले नाहीत. नागरिकांनी या घटनेची माहिती करवीर पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु होता. याप्रकरणी रात्री उशीरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.