शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: भीक मागण्यासाठी महिलेने दोन मुलांचे केले अपहरण; मिरज, गोव्यात शोध सुरू

By उद्धव गोडसे | Updated: August 31, 2023 16:57 IST

कोल्हापूर : ओळखीतील महिलेनेच भीक मागण्यासाठी कनाननगरातील दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी (दि. २७) दुपारपासून ...

कोल्हापूर : ओळखीतील महिलेनेच भीक मागण्यासाठी कनाननगरातील दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी (दि. २७) दुपारपासून मुले आणि संशयित महिला गायब आहे. याबाबत अपहृत मुलाच्या नातेवाईकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मिरज आणि गोव्यात मुलांचा शोध सुरू आहे. रुपाली नितीन खाडे (वय ११) आणि भीमा मोहन कुचकोरवी (वय १२, दोघे रा. कनाननगर, कोल्हापूर) अशी अपहृत मुलांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात स्टेशन रोडवर भीक मागून उदरनिर्वाह करणारी एक महिला कनाननगरात राहत होती. अधूनमधून ती कनाननगरातील काही मुलांना सोबत घेऊन भीक मागण्यासाठी जात होती. रविवारी दुपारी महावीर गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेलेले भीमा आणि रुपाली यांना घेऊन ती निघून गेली. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शहरात मुलांचा शोध सुरू केला. मात्र मुलांसह संशयित महिलेचाही काहीच सुगावा मिळाला नाही. यांच्या शोधासाठी एक पथक मिरज येथे, तर दुसरे पथक गोव्याला गेले आहे. शहरातही एका पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन दिवस शोध घेऊनही मुले सापडत नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण