शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- रानडुक्कराच्या हल्यात महिला जखमी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:17 IST

खोत यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच रानडुक्कराने डोंगराच्या दिशेने धुम ठोकली

अनिल पाटील सरुड : सावर्डे बुद्रुक तालुका शाहूवाडी येथे शेतात गेलेल्या महिलेवर रानडुक्कराने पाठलाग करून हल्ला केला. या हल्यात आनंदी गणपती खोत (वय ४२) जखमी झाल्या. परिसरात प्रथमच रानडुक्कराच्या हल्याची घटना घडल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी, आनंदी खोत या शनिवारी सकाळी शेतामध्ये जात होत्या. यावेळी समोरुन एक रानडुक्कर त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसले. रानडुक्कराला घाबरुन त्या परत जात असताना रानडुक्कराने पाठलाग करून खोत यांच्यावर हल्ला केला. यावेळी खोत यांनी आरडा ओरडा केल्यानंतर शेजारील शेतामधील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच रानडुक्कराने तेथून शेजारील डोंगराच्या दिशेने धुम ठोकली.

हल्यात खोत यांच्या पायला व हाताला जबर मार बसला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान सावर्डे बुद्रुक परिसरातील डोंगर रांगेत गेल्या अनेक महिन्यापासुन रानडुक्करांचा एक कळप तळ ठोकुन आहे. या रानडुक्करांनी परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान केले आहे.  त्यामुळे वनविभागाने या रानडुक्करांच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर