शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा सांभाळ करा, मी जीव देतेय म्हणत घेतली पंचगंगेत उडी, आंबेवाडीतील महिला बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:05 IST

रागाच्या भरात वडिलांना फोन केला. पंचगंगा नदीत उडी घेत असल्याचे त्यांना सांगितले आणि धाडकन सिमेंटच्या पिलरवरून तिने पाण्यात उडी घेतली.

कोल्हापूर : मी पंचगंगा नदीत उडी घेऊन जीव देत आहे. माझ्या मुलाचा सांभाळ करा, असा वडिलांना फोन करून आंबेवाडी (ता. करवीर ) येथील एका महिलेने नदीतील पाण्यात उडी मारली. पण पोहणारी मुले आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस वेळीच मदतीला धावले. तिला पाण्याबाहेर काढल्याने ती वाचली. तिचे समुपदेशन करून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.पोलिसांनी सांगितले की, आंबेवाडी सासर असलेल्या महिलेचा विवाह २०१२ साली झाला. तिला नऊ वर्षाचा मुलगा आहे. कौटुंबिक वादातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. शुक्रवारी पती तिच्यावर रागावला. तो घरातून कामावर निघून गेल्यानंतर ती सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडली. पंचगंगा नदीजवळील आली. रागाच्या भरात वडिलांना फोन केला. पंचगंगा नदीत उडी घेत असल्याचे त्यांना सांगितले आणि धाडकन सिमेंटच्या पिलरवरून तिने पाण्यात उडी घेतली.नदीत पोहणाऱ्या तरुणांनी तिला पाहिले व तातडीने जाऊन त्यांनी त्या महिलेला वेळीच बाहेर काढले. याची माहिती मिळताच गस्तीतील पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या महिलेस उपचारासाठी दाखल होण्याची विनंती केली. मात्र ती नकार देत होती. तिची समजूत काढल्यानंतर तिने उपचार करून घेण्यास संमती दिली. तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. करवीर पोलिसांनी रात्री त्या महिलेच्या कुटुंबीयांना बोलवून घेतले.गेल्या महिन्यातही पन्हाळा तालुक्यातील महिला व तिच्या मुलीस रंकाळा तलावात आत्महत्या करण्याच्या हेतूने आलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात पोलिसांना यश आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर