शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

मेंढरांच्या कळपात लबाड लांडगा--

By admin | Updated: August 27, 2015 23:13 IST

‘कारण राजकारण

प्रसंग पहिला : सांगलीचे मुन्नाभाई बुधवारी काँग्रेसच्या मेळाव्यात दिसले. सोनसळकर साहेबांनी त्यांना हिकमतीनं स्टेजवर आणलं होतं. मुन्नाभार्इंच्या घरवापसीच्या चर्चा झडतात न् झडतात तोच ते गुरुवारी भाजपवासीही झाले! नाहीतरी आता काँग्रेसमध्ये (त्यातही सांगली शहरात) ते अडगळीतच पडले होते. महापालिका निवडणुकीत ‘गेम’ झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षत्याग करून मदनभाऊंविरोधात बंडखोरी (कुणी म्हणतात, मतं खाण्यासाठी.) केली होती. भाऊ पडले, पण काळ्याभोर केसांचा लफ्फेदार भांग पाडतापाडता मुन्नाभाईही बाजूला पडले. भाऊ पडल्यानंतर फटाक्यांची माळ लावणाऱ्या मुन्नाभार्इंचं शहराध्यक्षपद पृथ्वीराज पाटलांकडे गेलं. आता संजयकाकांनी त्यांना खुणावलं आणि काँग्रेसमधल्या काहींना (पक्षी : मदनभाऊंना) बॉक्सिंगचा ‘पंच’ लगावण्यासाठी त्यांनी कमळाबाईचे ग्लोव्हज् हातात चढवले. मुन्नाभाई तसे प्रकाशबापू गटाचे, नंतर सोनसळकर साहेबांचे कधी झाले, ते समजलंच नाही... आणि आता तर त्यांचाही हात सोडून काकांकडं गेले. डीसीसीच्या निवडणुकीत पतंगरावांच्या पॅनेलमधून (आणि काकांच्या रसदीवर) निवडून आलेले शिरगाव-विसापूरचे डॉ. प्रताप पाटीलही संचालक होताच काकांसोबत फिरू लागले. प्रसंग दुसरा : संजयकाकांनी कवठ्यातील राष्ट्रवादीच्या तळ्यातही गळ टाकलाय. दोन माजी उपसभापतींसह एक शहराध्यक्ष त्यांच्या हाताला लागलेत. तासगाव-कवठ्यातले आबांचे मावळे एकतर काकांच्या मागं चाललेत किंवा सोनसळकर साहेबांचा हात धरताहेत. इस्लामपूरकर साहेबांकडं चाललेल्या आबांच्या मावळ्यांना अलीकडं काका आपल्या तंबूत वळवताहेत. इस्लामपूरकर साहेब आणि काका यांच्यातलं ‘अंडरस्टँडिंग’चं धुकं गडद होतंय की विरळ, हेच कळेना झालंय म्हणे! त्यामुळंच राष्ट्रवादीतली पडझड रोखण्यासाठी खुद्द पवार साहेब सांगलीत येताहेत वाटतं. इस्लामपूरकर साहेबांनी मोठ्या हुशारीनं घोरपडे सरकार आणि दिनकरतात्यांना वश केलं होतं. (अर्थात वापर झाल्यावर त्यांना टाकूनही दिलं!) काकांना सांगून दोघांना कमळाबाईच्या तंबूत पाठवलं होतं. पण काकांकडून हवं ते न साधल्यानं दोघं सोनसळकर साहेबांकडं गेलेत. (तसं दोघंही यापूर्वी सोनसळकर साहेबांचं ऐकायचे.) आता ते परत आलेत म्हटल्यावर साहेबांनी लगेच घोरपडे सरकारांच्या पारड्यात बाजार समितीचं उपसभापतीपद टाकलं.प्रसंग तिसरा : ‘प्रभाकर घार्गे कुठं आहेत हो?’ असा सवाल अलीकडं विचारला जातोय. आता कोण हे प्रभाकर घार्गे, असं कुणी विचारलं तर काय उत्तर द्यायचं, या प्रश्नानं तर नेत्यांनाही छळलंय. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर आमदार घार्गे खटाव-माण सोडून इकडं फिरकलेच नसल्याचा हा परिणाम..! तर या घार्गेंची टर्म आता संपतेय. आता सांगलीची बारी असल्यामुळं त्या जागेवर डोळा असणाऱ्यांनी म्हणे ’फिल्डिंग’ लावायला सुरुवात केलीय. हां-हां म्हणता ही यादी मोठी होतेय. मदनभाऊंना ‘एमएलसी’ पाहिजे असल्यानं त्यांनी इस्लामपूरकर साहेबांशी आणि काकांशी जुळवून घेतलंय, असं ऐकायला येतंय. तसं असेल तर सोनसळकर साहेब गप्प बसतील का? विशालदादा-प्रतीकदादा केवळ बघत बसणार का? कमळाबाईच्या तंबूतल्या गावभागवाल्यांना ते चालेल का? (अर्थात त्यांच्यात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची रांग मोठी असली तरी हातात मतं पाहिजेत ना!) दरवेळच्या निवडणुकीत लढण्याआधीच तहामध्ये जिंकणारे पेठनाक्यावरचे नाना महाडिक यावेळी काय करणार? आष्ट्याच्या शिंदे साहेबांचं पुनर्वसन कसं करणार? अशी प्रश्नांची जंत्री पुढं येतेय... पण इस्लामपूरकर साहेब आणि काकांनी खरंच मनावर घेतलं, तर मदनभाऊ पुन्हा आमदार होऊ शकतात. प्रश्न आहे तो, ते मनावर घेणार की, पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसारखा कात्रजचा घाट दाखवणार हाच?प्रसंग चौथा : काकांची पत्रकार परिषद : कमळाबाईच्या तंबूत नव्यानं येणाऱ्यांना सत्तासुंदरीनं खेचलंय की, काकांनी भुलवलंय? काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या निष्ठावानांना भाजपमध्ये आणण्याचं श्रेय कुणाचं? तंबूची सूत्रं कुणी हलवायची? आयुष्यभर पक्षासाठी झिजलेले भाजपेयी मोठे की, सत्तेच्या लालसेनं आलेले नवे कारभारी भारी? येतील त्यांना ‘गोमूत्र’ शिंपडून पवित्र करून घ्यायचं का? आमच्या वाट्याला एखाद्या महामंडळाचा तुकडाही नाही का?... अशा प्रश्नांनी ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असं म्हणवून घेणाऱ्या या तंबूतल्या दुढ्ढाचार्यांच्या मेंदूचं दही झालंय! गाडगीळ सराफ, नीताताई, मिरजेचे मकरंद, पेढी चालवणारे विश्रामबागचे इनामदार, गरूडभरारी घेण्यासाठी इकडंतिकडं पाहणारे राजाराम, दोघे-तिघे तात्या, गावभागातले भाजपेयी, शाखेच्या बौद्धिकावर वाढलेली काळ्या टोपीखालची डोकी या मंडळींच्या चेहऱ्यावरचे असले चित्रविचित्र भाव हेच सांगून जातात. काहीजण कानकोंडे होऊन कोपऱ्यात बसून राहतात...जाता-जाता : परवा इस्लामपूर-तासगाव-व्हाया पलूस-कडेगाव एसटीत एका इरसाल म्हाताऱ्यानं एक गोष्ट सांगितली. एका मेंढपाळाच्या कळपात नवं पिल्लू शिरलं. जरा वाकड्या चालीचं, पण हुबेहुब मेंढरासारखंच. गोंडस आणि अवखळही. कळपाकडं वाकड्या नजरेनं बघणाऱ्या शिकारी प्राण्यांवर ते गुरगुरायचं. त्यामुळं आपसूकच कळपाचा आणि मेंढपाळाचाही जीव बसला त्याच्यावर. मेंढपाळानं त्याला कळपातच वाढवलं. कळप तसा भला मोठा, त्यामुळं मेंढपाळाला सगळ्या मेंढरांकडं लक्ष देता येत नव्हतं. ते पिल्लू मोठं व्हायला लागलं, पण कळप कमी व्हायला लागला... आणि एक दिवस मेंढपाळाला साक्षात्कार झाला. आपण ज्या पिल्लाला वाढवलं, मोठं केलं, ते मेंढरू नाही, तर तो लबाड लांडगा आहे! आणि आपलं लक्ष चुकवून कळपातल्या एकेक मेंढराचा फडशा पाडतोय... गोष्ट संपली. म्हातारा हसत-हसत गाडीतून उतरून गेला.ताजा कलम : या गोष्टीचा आणि वरील घटनांचा अर्थाअर्थी संबंध नाही. तरीही कुणी तो जोडलाच, तर आपापल्या जबाबदारीवर पात्रं तपासून घ्यावीत.श्रीनिवास नागे‘कारण राजकारण