शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी विश्वकोशाच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार हरपले   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:53 IST

मराठी विश्वकोशाचे निवृत्त विभाग संपादक डॉ. सु. र. तथा सुरेश रघुनाथ देशपांडे हे ‘भैयासाहेब’ म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कागल येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल येथे झाले.

ठळक मुद्दे मराठी विश्वकोशाचे निवृत्त विभाग संपादक डॉ. सु. र. तथा सुरेश रघुनाथ देशपांडे हे ‘भैयासाहेब’ म्हणून प्रसिद्ध.  वीस खंडांसाठी योगदान; हजारो नोंदींचे लेखन, समीक्षण  

कोल्हापूर : मराठी विश्वकोशाचे निवृत्त विभाग संपादक डॉ. सु. र. तथा सुरेश रघुनाथ देशपांडे हे ‘भैयासाहेब’ म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कागल येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथून घेतल्यानंतर ‘यादव शिल्पशैली’ या प्रबंधावर त्यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथून पीएच. डी. संपादन केली. यानंतर त्यांनी १९५९-६४ पर्यंत शिक्षक, प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोशात नोकरीस सुरुवात केली आणि वाई ही त्यांची कर्मभूमी झाली. सन १९६४ ते २०१८ म्हणजे अगदी अखेरपर्यंत म्हणजे ५४ वर्षे त्यांनी मराठी विश्वकोश निर्मितीला वाहून घेतले. मराठी विश्वकोशाच्या १ ते २० खंडांत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही सहसंपादक, विभाग संपादक ही पदे लीलया पेलली. 

यादव स्कल्प्चर (इंग्रजी), मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, भारतीय गणिका, सरस्वती दर्शन, पेशवेकालीन पुणे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, प्राचीन भारतीय शिल्पवैभव, भारतीय कामशिल्प, वाई : कला आणि संस्कृती, आदी १७ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळाला. त्यांची अनेक पुस्तके विविध विद्यापीठांच्या अभ्याससूचीत समाविष्ट झाली.

मराठी विश्वकोशात हजारो नोंदींचे लेखन-समीक्षण त्यांनी केले. ‘लव इन स्टोन’ हे त्यांचे अलीकडे प्रसिद्ध झालेले इंग्रजी पुस्तक. गोवा राज्यातील मराठी विश्वचरित्र कोशातही त्यांनी सन्माननीय लेखक, संपादक, सल्लागार म्हणून काम केले. याशिवाय आकाशवाणीसह विविध प्रसिद्ध नियतकालिकांतून प्रसंगोपात स्फूटलेखन केले.

मराठी विश्वकोशात आद्यसंपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून मे. पुं. रेगे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड ते विद्यमान प्रमुख संपादक दिलीप करंबेळकर यांच्यापर्यंत त्यांनी लेखन, संपादनाचे काम अव्याहत केले. वयाच्या ८२ व्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशी त्यांची रोज सलग आठ तास अभ्यासाची बैठक आणि काम करण्याची पद्धत होती. २०११ मध्ये रुजू झालेल्या आम्हा सर्व तरुण संपादकांना त्यांनी सहज आपलेसे करून नेहमी मार्गदर्शन केले.

 

प्रेमळ स्वभाव, नेहमी मदतीची तयारी, उंच व देखणी शरीरयष्टी, सडपातळ बांधा, सतत उत्साही व हसरा चेहरा ही भैयासाहेबांची बलस्थाने होती. माझाही संपादनाचा  प्रमुख विषय इतिहास असल्याने भैयासाहेब मला अगदी जवळ होते. नोंदीतील कोणतीही शंका ते सप्रमाण सिद्ध करत व निर्भीड, सडेतोड प्रतिक्रिया देत. याचा अनेक ज्येष्ठ लेखकांनाही अभिमान वाटत असे.

ज्येष्ठ इतिहासकार ग. ह. खरे हे त्यांचे मार्गदर्शक, तर ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव त्यांचे वर्गमित्र. इतिहासाबरोबर ज्योतिष व हस्तरेषांमधील त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा होता; पण कर्मकांडे त्यांना मान्य नव्हती. गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती थोडी अस्वस्थ होती; पण तरीही भ्रमणध्वनीवरून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नेहमी आम्ही संपर्कात होतो. दिवाळीनंतर मी एक दिवस वाईत येतो, मग आपण भेटूया, असे त्यांनीच मला आश्वस्त केले होते. डिसेंबरपासून मी कार्यालयात येईन, नोंदी काढून ठेवा, अशा सूचनाही त्यांनी मला केल्या होत्या. मात्र, आज भैयासाहेब गेल्याचे कळले आणि मी स्तब्ध, सुन्न झालो, माझा आधारवड कोसळला, दीपस्तंभ हरविला, मी एक इतिहास गमविला.- सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहायक संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.     विचार करायला लावणारी मांडणीभैयासाहेब आयुष्यात नेहमी स्पष्ट भूमिकेत जगले. प्रसिद्धीपासून दूर राहून या इतिहासकाराने भारतीय प्राचीन, मध्ययुगीन व मराठेशाही यांची जी मांडणी केली, ती इतिहासप्रेमींसह सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. त्यांचे ‘मराठेशाहीतील मनस्विनी’ हे पुस्तक म्हणजे मराठा इतिहासातील महिलांच्या कर्तृत्वाचे सोनेरी पान ठरेल.