कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत येथील शां.कृ. पंत वालावकर हायस्कूलचा विद्यार्थी श्रीवर्धन बनसोडे हा प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला कमरेला ७५ दिवे लावून हातावर ७५ मीटर चालण्याचा विश्वविक्रम करणार असल्याची माहिती वालावलकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी आणि क्रीडा शिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.श्रीवर्धन याला लहानपणापासून हातावर चालण्याचा छंद आहे. त्याला वडील क्रीडा शिक्षक राजेंद्र बनसोडे आणि घरच्यांनी प्रोत्साहन दिले. त्याच्या प्रोत्सानाला बळ देण्यासाठी २६ जानेवारी रोजी वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी साडेसहा वाजता श्रीवर्धन कमरेला ७५ दिवे बांधून ७५ मीटर हातावर चालण्याचा विक्रम करणार आहे. या विक्रमाची नोंद 'एशिया पॅसिफिक बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये होणार आहे.
कमरेला ७५ दिवे बांधून ७५ मीटर हातावर चालणार, प्रजासत्ताक दिनी कोल्हापूरचा श्रीवर्धन विश्वविक्रम करणार
By पोपट केशव पवार | Updated: January 23, 2024 16:04 IST