कोल्हापूर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्याने कोल्हापूरात दिवसभर पावसाळी वातावरणासह जोरदार वारे वाहत होते. सायंकाळी कोल्हापूर शहरात पाऊस झाला. रविवारी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.दक्षिण पुर्व अरबी समुद्रात ह्यतौत्केह्ण चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या काही भागांना बसण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ व पावसाचे वातावरण राहिले. सकाळ पासूनच जोरदार वारे वाहत होते, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने खिडक्यांची तावदाणे, पत्रे जोरजोरात वाजत होते. किमान तापमान २६ डिग्री तर कमाल ३४ डिग्रीपर्यंत राहिले. त्यामुळे काहीसा उष्मापण जाणवत होता. सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र आकाश काहीसे मोकळे झाले.आज मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानात मोठी घट होणार असून कमाल तापमान २८ डिग्री तर किमान १९ डिग्रीपर्यंत राहणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे.
दिवसभर वारे, सायंकाळी हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 18:23 IST
Rain Kolhapur : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्याने कोल्हापूरात दिवसभर पावसाळी वातावरणासह जोरदार वारे वाहत होते. सायंकाळी कोल्हापूर शहरात पाऊस झाला. रविवारी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दिवसभर वारे, सायंकाळी हलक्या सरी
ठळक मुद्देदिवसभर वारे, सायंकाळी हलक्या सरीतौत्के वादळाचा परिणाम : जोरदार पावसाची शक्यता