शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

वाऱ्याच्या गतीने धावणारा-सतीश देसाई

By admin | Updated: February 8, 2017 00:05 IST

सतीशचा खरा फुटबॉल शहाजी छत्रपती कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बहरला.

सतीश देसाई यास शिवाजी संघाची साथ सोडून महाकाली तालीम संघात प्रवेश मिळाला. या संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात सतीशने शिवाजी तरुण मंडळावर दोन गोल करून महाकाली तालीम मंडळास विजयी केले. सतीशने ही आठवण आपल्या हृदयात कोरून ठेवली आहे.सतीश रामराव देसाई याचा जन्म वाशी नाका परिसरात झाला. सवंगड्यांसह खेळताना लहानपणीच सतीशला फुटबॉलची गोडी लागली. उन्हाळ्यात रंकाळ्यातील पाणी कमी झाल्यानंतर उघड्या हिरवळीवर मोठ्या ईर्षेने लहान मुलांच्या खेळात रंग भरत असे. त्याचा फुटबॉल खेळ या बाल चमूतून उदयास आला. ४ फूट ११ इंच उंचीच्या मापाच्या स्पर्धामध्ये सतीश डाव्या बगलेवर खेळू लागला. यावेळी तो म्युनिसिपल शाळा नं. ८ मध्ये होता. या स्पर्धा या शाळेच्या क्रीडांगणावर होत असत. सतीशला हास्कूलच्या जीवनात फुटबॉल खेळास फारसा वाव मिळाला नाही.सतीशचा खरा फुटबॉल शहाजी छत्रपती कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बहरला. शहाजी कॉलेजमध्ये क्रीडासंचालक कै. एस. पी. लाड यांच्या प्रेरणेमुळे व वणिरे सर, अकबर मकानदार यांच्या मार्गदर्शनामुळे शहाजी कॉलेजच्या फुटबॉल संघात पहिल्याच वर्षी त्याची ‘लेफ्ट आऊट’ या जागेवर निवड झाली. सतीशच्या काळात शहाजी, न्यू, गोखले व कॉमर्स या चार कॉलेजांमध्ये नेहमीच चुरस असे. शहाजी कॉलेजकडून सतीश तीन वर्षे खेळला. प्रत्येक वर्षी शिवाजी विद्यापीठ झोन, इंटर झोन स्पर्धेत सतीश ‘लेफ्ट आऊट’च्या टाळ्या घेऊन गेला. गरजेप्रमाणे तो आपल्या संघातून ‘लेफ्ट इन’लाही खेळला. डाव्या बगलेतून मुसंडी मारून वाऱ्याच्या गतीने प्रतिस्पर्धी संघावर स्कोअर केले आहेत. अखिल भारतीय पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धेत सतीशची शिवाजी विद्यापीठ संघात सलग तीन वेळा निवड होऊन त्याने अनुक्रमे गोवा, इंदूर आणि कोल्हापूर येथे ‘लेफ्ट आऊट’मधून चमकदार कामगिरी केली.सतीश देसाई आता ‘लेफ्ट आऊट’ या जागेवर परिपक्व झाला. बेताची उंची, निमगोरा रंग, दणकट शरीरयष्टी, मितभाषी, खेळातील तांत्रिक बाजू भक्कम. त्याच्या खेळात गती होती. फर्स्ट टाईम पास देणार. डाव्या बगलेतून लो- ड्राईव्ह किंंवा साईड व्हॉली किकच्या सहायाने गतिमान स्कोअर करण्याची स्टाईल वाखाणण्यासारखी होती. अनेक सामन्यांत त्याने असे गोल केले आहेत.त्याच्या खेळाने त्याला स्थानिक सीनिअर संघात मागणी वाढू लागली. त्याकाळात नावाजलेल्या संघात स्थान मिळणेही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. त्यावेळी खेळाडूला आताप्रमाणे पैसा मिळत नव्हता. पदरमोड करून बऱ्याचवेळा स्पोर्टकिट्ची जमवाजमव करून खेळाडू खेळत असत. दरम्यान, सतीशला स्थानिक शिवाजी तरुण मंडळ या संघाकडून ‘लेफ्ट आऊट’ या जागेवर खेळण्याची संधी मिळाली. कोल्हापुरात पावसाळ्यानंतर अनेक संयोजक मंडळांच्या स्थानिक स्पर्धा होत. या सर्व प्रकारच्या स्पर्धा सतीश खेळला. शिवाय याच संघातून मिरज, सांगली, गडहिंंग्लज, बेळगाव, दारव्हा, पुणे, इत्यादी बाहेरगावच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी लाभली. सतीश फार काळ शिवाजी संघाकडून खेळला नाही. त्याला पेठेतीलच महाकाली तालीम फुटबॉल संघात स्थान मिळाले. या संघाकडून खेळतानाही त्याने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या कोल्हापुरी खेळाचे पाणी दाखविले. महाकाली तालीम संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात सतीशने शिवाजी तरुण मंडळावर दोन गोल करून महाकाली तालीम मंडळास विजयी केले. सतीशने ही आठवण आपल्या हृदयात कोरून ठेवली आहे. सतीश देसाई याने ‘कॉमर्स’ विषय घेऊन पदवी परीक्षा पूर्ण केली. नोकरीच्या मागे न लागता आपल्या भावाच्या सहायाने गेली अनेक वर्षे किराणा मालाचा उत्तम व्यापार करीत आहे. स्वभावाने अत्यंत मवाळ. सामना चालू असताना शांतपणे खेळणारा, अजातशत्रू, मितभाषी. फुटबॉलमधील सर्व अनिष्ट प्रथांपासून दूर राहणारा. सामना रेफ्रींचा आदर बाळगणारा. खिलाडूवृत्ती जपणारा. संयमपूर्वक बोलणारा. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही कोणतेच कार्ड घेतले नाही. यातून त्याच्या स्वभावाचे गमक लक्षात येईल. (उद्याच्या अंकात : शौकत महालकरी)प्रा. डॉ. अभिजित वणिरे