शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सिद्ध करणार नाही, खुशाल छळछावणीत टाका : कुमार सप्तर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 17:33 IST

कोणतीही जात-धर्म न मानता देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला असताना नागरिकत्व सिद्ध करण्याचा काढलेला फतवा ही मनुवादी केंद्र सरकारची मनमानी आहे. राज्यघटनेच्या आधीच्या जंजाळात अडकायचे की घटनेने दिलेल्या मार्गावरून पुढे चालायचे, हे निवडण्याची वेळ आली आहे. मी कोणतीही कागदपत्रे देणार नाही, मला खुशाल छळछावणीत टाका, असे आव्हानच ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिले.

ठळक मुद्देनागरिकत्व सिद्ध करणार नाही, खुशाल छळछावणीत टाका : कुमार सप्तर्षीगांधी आणि राज्यघटनेच्या मार्गाने जाण्यातच देशाचे भले

कोल्हापूर : कोणतीही जात-धर्म न मानता देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला असताना नागरिकत्व सिद्ध करण्याचा काढलेला फतवा ही मनुवादी केंद्र सरकारची मनमानी आहे. राज्यघटनेच्या आधीच्या जंजाळात अडकायचे की घटनेने दिलेल्या मार्गावरून पुढे चालायचे, हे निवडण्याची वेळ आली आहे. मी कोणतीही कागदपत्रे देणार नाही, मला खुशाल छळछावणीत टाका, असे आव्हानच ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिले.व्ही. टी. पाटील स्मृतिभवनाच्या सभागृहात ताराराणी विद्यापीठाच्या वतीने क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेअंतर्गत ‘आधुनिक भारताची बांधणी’ या विषयावर डॉ. सप्तर्षी यांनी शुक्रवारी विचारपुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील होते.सप्तर्षी म्हणाले, मनुस्मृतीला अपेक्षित राज्यकर्ते सध्या केंद्रात सत्तेवर आहेत. ते जे बोलतील तेच प्रमाण आणि तेच अंतिम असा कारभार सध्या सुरू आहे. कोणत्याही चर्चेविना निर्णय लादले जात आहेत. बहुमत हे स्थिरतेचे लक्षण असते; पण हेच पाशवी बहुमत देशासाठी काळ बनू पाहत आहे. आता जनतेनेच शहाणे होण्याची गरज आहे.भूतकाळातील व्यवस्था एका बाजूला आणि गांधीवादी विचारसरणी दुसऱ्या बाजूला, अशी विभागणी झाली असून, देशासाठी काठावरची भूमिका घेऊन चालणार नाही. मनुस्मृतीपासून फारकत घेऊन राज्यघटनेपर्यंत पोहोचण्याचा मार्गच स्वीकारावा लागणार आहे. गांधी यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्यातच देशाचे भले आहे.शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. सुजय पाटील यांनी परिचय करून दिला. एम. डी. चव्हाण यांनी आभार व सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव प्राजक्त पाटील यांच्यासह विद्यार्थिनी व शिक्षकांची उपस्थिती होती.

 

 

टॅग्स :Kumar Saptarshiकुमार सप्तर्षीkolhapurकोल्हापूर