शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सादळे-मादळेत पडक्या विहिरीत पडला रानटी डुकरांचा कळप; वनविभाग, रेस्कू टीमने दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:15 IST

शिरोली : सादळे मादळे (ता. करवीर) येथे पडक्या विहिरीत पडलेल्या दहा रानटी डुकरांच्या कळपाला वनविभाग व रेस्कू टीमने ५ ...

शिरोली : सादळे मादळे (ता. करवीर) येथे पडक्या विहिरीत पडलेल्या दहा रानटी डुकरांच्या कळपाला वनविभाग व रेस्कू टीमने ५ तासांच्या अथक परिश्रमाने बाहेर काढून जीवदान दिले दिले.अधिक माहिती अशी सादळे, ता. करवीर येथे सिद्धेश्वर मंदिराच्या पश्चिमेस विक्रम पाटील यांच्या शेतामध्ये अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी एक ते दीड वर्ष वयाचा दहा रानटी डुकरांचा कळप वावरत असताना पन्नास फूट खोल पडक्या विहिरीत पडला, बुधवारी सकाळी सादळे येथील शेतकरी तानाजी पाटील शेतात जात असताना त्यांना डुकरांचा कळप विहिरीत पडलेला आढळून आला. त्यांनी सादळे मादळे ग्रामपंचायतीला याची कल्पना दिली. ग्रामपंचायतीने वनविभागाला कळल्यानंतर ताबडतोब वनविभागाचे कर्मचारी व रेस्कू टीम लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाली. वनविभागाने विहिरी भोवतालचे झुडपे काढून दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून जाळीचा वापर करून एक एक करून दहा डुकरांना विहिरीतून बाहेर काढून पिंजऱ्यामध्ये बंद केले याकरिता जवळपास पाच तासांचा कालावधी लागला. यानंतर वनविभागाच्या व्हॅनमध्ये पिंजरे घालून डुकरांना नैसर्गिक अधिवास सोडण्यासाठी नेण्यात आले यावेळी वनविभागाचे विकास घोलप सुरेश दळवी. वन्यजीव बचाव पथक वनविभाग कोल्हापूर, वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी, छत्रपती वाइल्ड लाइफ कोल्हापूर, ॲडव्हेंचर गीअर कोल्हापूरसह रेस्कू टीममध्ये एकूण २० सदस्य सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग