शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:08 IST

कोणी प्रियसीची, कोणी पत्नीची तर कोणी मैत्रिणीची हौस-मौज पुरवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण चोऱ्या करून मिळणाऱ्या पैशांतून पत्नीची हौस पूर्ण करणारा महाबिलंदर राजारामपुरी पोलिसांच्या हाती लागला.

ठळक मुद्देगोकुळ शिरगावमधील युवकास अटक पाच दुचाकी, ८ मोबाईल जप्त; साथीदार चोरटा फरार

कोल्हापूर : कोणी प्रियसीची, कोणी पत्नीची तर कोणी मैत्रिणीची हौस-मौज पुरवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण चोऱ्या करून मिळणाऱ्या पैशांतून पत्नीची हौस पूर्ण करणारा महाबिलंदर राजारामपुरी पोलिसांच्या हाती लागला.

महेश राजाराम गायकवाड (वय २२, रा. गणेश मंदिरशेजारी, गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी व ८ मोबाईल हँडसेट असा सुमारे २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचा साथीदार प्रकाश शांताराम कोकाटे (रा. मोतीनगर) हा अद्याप फरारी आहे.राजरामपूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोबाईल जबरदस्तीने काढून चोरीच्या अनेक घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांनी गुन्हे शोधपथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संबंधित चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलिसांनी महेश गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पत्नीची हौस पूर्ण करण्यासाठी दुचाकी व मोबाईल हॅडसेट चोरी केल्याचे कबूल केले. त्याने ह्या चोऱ्या साथीदार प्रकाश शांताराम कोकाटे याच्यासोबत केल्याचेही सांगितले.

रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल हिसकावून घेणे, शहर व परिसरातील दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कोकाटेचा शोध घेतला पण तो फरारी आहे. पोलिसांनी अटक केलेल्या महेश गायकवाड याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी व आठ मोबाईल हॅडसेट असा सुमारे २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, हवालदार आनंदा निगडे, पोलीस नाईक प्रकाश पारधी, सुभाष चौगले, प्रवीण पाटील, रोहन पोवार, महेश पाटील, रवीकुमार आंबेकर, तानाजी दावणेकर, विशाल खराडे, प्रशांत पाथरे, सिध्देश्वर केदार आदींनी केली.काही महिन्यांपूर्वीच केला प्रेमविवाहमहेश गायकवाड याचा काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेला आहे. विवाहापूर्वी त्याने पत्नीच्या हौस-मौज पुरवल्या होत्या. विवाहानंतर त्या पुरवण्यात अडचणी उभारल्याने त्याने चोरीचा मार्ग शोधला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर