शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

तीन सिलेंडर मुश्रीफ यांच्या मतदार संघात ?, इसलीये प्रकाशअण्णा को गुस्सा आता है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 14:28 IST

Prakash Awade Ichlkarnaji News Kolhapur : इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात आरोग्यसेवेचा सावळा गोंधळ उडाला आहे. शासनाकडून मिळालेले 6 ड्युरा सिलेंडर गायब, धोकादायक ऑक्सिजन गळती सुरूच, स्टाफ नाही, डॉक्टर नाहीत आणि मंत्री म्हणतात प्रकाश अण्णा को गुस्सा क्यू आता है, इसलीये गुस्सा आता है,असा प्रति टोला आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देआयजीएम मध्ये आरोग्यसेवेचा सावळा गोंधळ6 ड्युरा सिलेंडर गायब, ऑक्सिजन गळती सुरूच

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात आरोग्यसेवेचा सावळा गोंधळ सुरू आहे. शासनाकडून मिळालेले सहा ड्युरा सिलिंडर गायब, धोकादायक ऑक्सिजन गळती सुरूच, स्टाफ नाही, डॉक्टर नाहीत आणि मंत्री म्हणतात प्रकाश अण्णा को गुस्सा क्यू आता है, इसलीये गुस्सा आता है. असा प्रति टोला आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.आयजीएम हे जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल असताना फक्त शासनाच्या दुर्लक्षाने आरोग्य सेवा कोलमडली आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत असतानाही जाणीवपूर्वक या शहराकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे संघर्ष अटळ आहे. वेळप्रसंगी लागेल ते करू; पण आयजीएम आता टकाटक करणार आहे, असा विश्वासही आवाडे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.रुग्णालयात अचानक भेट देऊन पाहणी केली असता सर्व गोंधळाचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑक्सिजन गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नाशिक येथे आॅक्सिजन गळतीची मोठी दुर्घटना घडली, तशी एखादी गंभीर घटना घडल्यावर हे सरकार याकडे बघणार का?

सध्या सुरू असलेल्या ऑक्सिजन गळतीमुळे एका पाईपमध्ये बर्फसदृश घनपदार्थ जमा होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी दाबाने होतो. तसेच ही गळती दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. विविध सामाजिक संस्थांनी दिलेले ६० ते ७० ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीन आयजीएममध्ये वापराविना पडून आहेत. असे अनेक साहित्य मनुष्यबळ नसल्याने पडून आहे आणि रुग्णांना उपचार नाही, अशी परिस्थिती बनली आहे.शासनाने ६ ड्युरा सिलिंडर दिलेले असताना रुग्णालयात ५ पोहोचले. एक कुठे गेला माहीत नाही. मिळालेले पाच कुठे आहेत याची माहिती घेतली असता त्यातील ३ सिलिंडर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील गडहिंग्लजच्या रुग्णालयात दिल्याचे सांगण्यात आले, तर दोन शहरातील एका खासगी रुग्णालयात गरज असल्याने दिल्याचे सांगितले.

एका ड्युरा सिलिंडरमध्ये किमान ३० जम्बो आॅक्सिजन सिलिंडर ऑक्सिजन मावतो एवढी त्याची क्षमता आहे. या शहरात गरज असताना ते अन्यत्र हलवण्यात आले. याला जबाबदार कोण? या संपूर्ण परिस्थितीची चाचपणी केली असता या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे प्रकाशअण्णा को गुस्सा आता है. पत्रकार बैठकीस सुनील पाटील, प्रकाश दत्तवाडे, सतीश कोष्टी, आदी उपस्थित होते.ऑक्सिजन पार्क तयार करणारलवकरच आयजीएम रुग्णालयात सामान्य नागरिकांना, पोष्ट कोविड रुग्णांना दिवसातून गरजेनुसार ऑक्सिजन घेण्यासाठी तेथे ६० ते ७० ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीन बसवून ऑक्सिजन पार्क तयार करणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडेHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर