शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

कागलच्या ‘त्या’ ठेकेदारावर फौजदारी का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या कागल तालुक्यातील ‘त्या’ ठेकेदाराला केवळ चार महिन्यांत पुन्हा कंत्राट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या कागल तालुक्यातील ‘त्या’ ठेकेदाराला केवळ चार महिन्यांत पुन्हा कंत्राट कसे दिले गेले आणि अधिकाऱ्याची बोगस सही करणाऱ्या याच ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी बुधवारी केली. संबंधित ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. शिवाय कागल तालुक्यातीलच काही गावातील लोकांनी हा ठेकेदार नको म्हणून भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय दृष्ट्याही हा विषय तापण्याची शक्यता आहे.

निंबाळकर यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहिले असून, दुसऱ्या पत्राद्वारे त्यांनी जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सभेचे चित्रीकरणही मागवले आहे. कागल तालुक्यातील ज्या ठेकेदाराने अधिकाऱ्याची बोगस सही केली. त्या ठेकेदाराला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले होते. मार्च २० मध्ये त्याला तसे पत्र दिले असताना लगेचच चार महिन्यात त्याच आदेशाला स्थगिती देऊन पुन्हा त्याला कागल तालुक्यातील कामे कशी दिली गेली, अशी विचारणा निंबाळकर यांनी लेखी पत्रात केली आहे. या ठेकेदाराच्या कागल तालुक्यातील सर्व कामांची चौकशी करून मगच बिल अदा करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मंगळवारी जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा झाली. यावेळी अनेक वेळा झालेली चर्चा ऐकूही येत नव्हती. या पार्श्वभूमीवर ज्या विषयांबाबत फारशी चर्चाच झालेली नाही ते ठराव होऊ नयेत, याची दक्षता म्हणून निंबाळकर यांनी ही मागणी केली आहे, तसेच कुस्तीच्या मटची खरेदी, ७४५ शिक्षकांना आगावू वेतनवाढ, संवर्ग १ शिक्षकांच्या बदल्या डावलून इतर संवर्गाच्या बदल्या याबाबत सभागृहामध्ये चर्चा होऊनही प्रत्यक्षात मात्र काही कारवाई झालेली नाही. याबाबत केलेल्या कारवाईचीही लेखी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने ९ शिक्षकांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यासंबंधीची कागदपत्रेही निंबाळकर यांनी मागितली आहेत. त्यामुळे वरील सर्व विषयांवरूनही यापुढच्या काळात वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.