शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

‘मुद्रा’तून ८00 कोटींची खिरापत कुणाला? सुशिक्षित बेरोजगार वंचितच :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:23 IST

सुशिक्षित बरोजगारांना स्वयंउद्योगाच्या संधी देण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजना मोठ्या थाटात सुरू करण्यात आली. विना तारण, विना जामीन व तेही झटपट कर्ज नवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना,

ठळक मुद्दे‘नवे-जुने’ करण्यावर भर देत बॅँकांनी कागदोपत्री केले टार्गेट पूर्ण

सुशिक्षित बरोजगारांना स्वयंउद्योगाच्या संधी देण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजना मोठ्या थाटात सुरू करण्यात आली. विना तारण, विना जामीन व तेही झटपट कर्ज नवा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना, व्यवसाय विस्तार करणाºयांना दिले जाते, अशा जाहिरातीद्वारे योजनेचा मोठा गवगवा करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीचे वास्तव मात्र वेगळे आहे. खरंच बेरोजगार, नवउद्योजकांना कर्ज मिळाले काय? विना तारण व झटपट कर्ज दिले गेले काय? तरुणांच्या कर्जासंबधी कागदपत्राच्या तक्रारी काय आहेत या साºयांचा ऊहापोह करणारी मालिका आजपासून...समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेखाली कर्ज घ्या आणि आपल्या उद्योग, व्यवसायाचे स्वप्न साकार करा’ अशी जरी जाहिरात केली गेली असली, तरी ‘नवे-जुने’ करूनच कोेल्हापूर जिल्ह्याने कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राज्यात कोल्हापूरने मुद्रा कर्ज वितरणात पाचवा क्रमांक पटकावला असला तरी खरोखरच बेरोजगारांना यातील किती कर्ज मिळाले तसेच वर्षभरात ८00 कोटी रुपयांचे कर्ज नेमके कुणाला वाटले याची शहानिशा करणे गरजेचे आहे.दोन वर्षांपूर्वी ही योजना वाजत-गाजत सुरू करण्यात आली. मात्र, खºया अर्थाने २०१७/१८ मध्येच ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी इचलकरंजी येथे आणि १९ जानेवारी २०१८ रोजी शिवाजी स्टेडियमवर मेगा मेळावा घेऊन या योजनेचे ढोल वाजविण्यात आले. सुमारे २५ हजार युवक-युवतींनी या मेळाव्याला भेट दिल्याचे सांगण्यात आले. १५ हजारांपेक्षा अधिक अर्जही दिले गेले. मात्र, प्रत्यक्षात किती जणांना कर्ज मिळाले हा संशोधनाचा विषय आहे. या मेळाव्याला उपस्थित राहून अनेकांनी आता आमचे फॉर्म भरले त्याच्या पोहोचही दिलेल्या नाहीत आणि आता बँकेत गेले की पोहोच मागतात, अशा तक्रारी सुरू केल्या आहेत.

तारण नाही, जामीन नाही‘तारणही नाही आणि जामीनही नाही’ अशी ही कर्ज योजना जाहीर केली गेल्याने हजारो जणांनी या योजनेतून कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली. ‘घरगुती व्यवसाय किंवा कुटिरोद्योग सुरू करण्यासाठी सवलतीच्या दराने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा,’ अशीही जाहिरात करण्यात आली. मात्र, ९ ते १२ टक्क्यांनी विविध बँका यासाठी कर्ज व्याजदर आकारात आहेत हे वास्तव आहे. यातून १0 ते १५ हजारांपर्यंत शिशु कर्ज दिले जाते. ५0 हजार ते ५ लाखांपर्यंत किशोर, तर ५ लाख १0 लाखांपर्यंत तरुण गटातून कर्ज दिले जाते. (क्रमश:)उद्योग सुरू असणाऱ्यांनाच कर्जकोल्हापूर जिल्ह्यात २६ जानेवारी २०१८ अखेर सुमारे ८०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम बेरोजगार, नवा व्यवसाय सुरू करणाऱ्या युवक-युवतींना विना जामीन, विना तारण दिल्याची शक्यता नक्कीच नाही. ज्यांचे उद्योग सुरू आहेत, मोठी कर्जे घेतली आहेत, अशांना ‘मुद्रा’मधून पुन्हा मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली गेली असून, बचत गटांना आणि कृषी वित्तपुरवठ्याचीही प्रकरणे त्यात समाविष्ट केल्याने हा आकडा वाढल्याची शक्यता आहे.२६ जानेवारी २०१८ अखेरची आकडेवारीबँकेचा प्रकार खातेदार मंजूर कर्ज रुपये वितरित कर्ज रुपयेस्टेट बँक समूह ११५२ ६० कोटी ९५ लाख ६० कोटी ७१ लाखसर्व राष्ट्रीयीकृत बँका १०४३८ ३२७ कोटी ९६ लाख ३०४ कोटी २४ लाखखासगी वाणिज्य बँका १४०२३ ११६ कोटी ९४ लाख ११६ कोटी ६२ लाखप्रादेशिक ग्रामीण बँका १६८ २ कोटी ३१ लाख २ कोटी २२ लाखलघु वित्त पुरवठा संस्था १,०९,१७३ २७७ कोटी ७१ लाख २७४ कोटी ९४ लाखलघु वित्त पुरवठा बँका १३२५९ ३८ कोटी ४८ लाख ३८ कोटी ४८ लाख१,४८,२१३ ८२४ कोटी ३५ लाख ७९७ कोटी २१ लाख