कोल्हापूर : जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या वतीने (व्हाईट आर्मी) शनिवारी सायंकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंती दिन ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच परिसरात दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ॲड. धनंजय पठाडे म्हणाले, व्हाईट आर्मीच्या वतीने दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती बिंदू चौकात साजरी केली जाते. त्यांच्या कार्याची माहिती नवीन पिढीला देण्याचे काम यामुळे होत आहे. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. व्हाईट आर्मीचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशांत शेंडे, विनायक भाट, हणमंत कुलकर्णी, विकास भोसले, राजेश्वरी रोकडे, कस्तुरी रोकडे, आदी व्हाईट आर्मीचे जवान यावेळी उपस्थित होते.
चौकट
ब्रिटिश सैन्यात आझाद हिंद सेनेसाठी गुप्तहेेर म्हणून काम करणारे रामचंद्र सीताराम कौलते (नाणीज, रत्नगिरी) यांच्या कन्या रजनीगंधा सूर्यकांत आबिटकर (रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) यांचीही यावेळी उपस्थिती होती. रामचंद्र कौलते १६ व्या वर्षी घरातून पळून जाऊन सैन्यात भरती झाले होते. आपल्या वडिलांनी आझाद हिंद सेनेसाठी काम केल्याचा अभिमान असल्याने अबिटकर गेल्या सहा वर्षांपासून बिंदू चौकातील व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावतात. यावेळी त्यांचा मुलगा राजदीपही उपस्थित होता.
फोटो : २३०१२०२१ कोल व्हाईट आर्मी न्यूज
ओळी : जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या वतीने (व्हाईट आर्मी) शनिवारी सायंकाळी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.