शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

चरखुदाईनंतरही गव्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: April 7, 2017 01:04 IST

चिकोत्रा प्रकल्प परिसर : पिकांचे नुकसानीचे सत्र सुरूच; शेतकरी त्रस्त

उत्तूर : आजरा तालुक्यातील महागोंड व पेरणोली या डोंगर कपारीतून व बेडीव व भुदरगड किल्ला येथून गव्यांचा कळप रात्री चिकोत्रा प्रकल्प परिसरात येतो. वनविभागाने चर खुदाई केली असली तरी गव्यांचा धुमाकुळ काही केल्या संपेनासा झाला आहे. रात्रीच्या वेळेस पिकांचे नुकसान हा चिंतेचा विषय बनला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी, आजरा हद्दीतील चिमणे, महागोंड, पेरणोली परिसराला लागून असणाऱ्या व गव्यांचा उपद्रव असणाऱ्या या ठिकाणी चरखुदाई केली आहे. मात्र, पाच वर्षांपूर्वी वनविभागाने केलेली चरखुदाई आता बुजली आहे. त्यामुळे गवे सहजरीत्या चिकोत्रा प्रकल्पाकडे येत आहेत.आजरा व भुदरगड हद्दीतील मोठ्या जंगलांना वणवा लागल्यामुळे गव्यांना खाण्यासाठी चारा नाही. चिकोत्रा प्रकल्प परिसरात ऊस, उन्हाळी भुईमूग, कडधान्ये, आदी पिके असल्याने गवे रात्रीच्या वेळी येत आहेत. शेतकरी शेतात जागरण करीत आहेत. मात्र, गव्यापुढे ते हतबल होत आहेत. रात्रभर पीक फस्त करून प्रकल्पातील पाणी पिऊन पहाटे पेरणोली, भुदरगडच्या जंगलात आसरा घेत आहेत.नोव्हेंबर महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत गव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस गव्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर वनगाई, रानडुक्कर, मोर या प्राण्यांकडूनही नुकसान होत आहे. बागायत शेती असून नसल्यासारखी आहे. चरखुदाई ही तीन ते चार फूट केली जाते. मात्र, जमिनीच्या धुपीमुळे ती बुजते. त्यामुळे गवे पुन्हा येऊ लागले आहेत. या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चिकोत्रा प्रकल्पातील शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)