चांगले काम करणाऱ्यावर, वागणाऱ्यावर नेहमीच शुभेच्छांचा वर्षाव होतो. त्याला वाढदिवस हेही एक निमित्त असते. काहीजण नाराजी व्यक्त करण्यासाठीही शुभेच्छांचा वेगळ्या पध्दतीने वापर करतात. संबंधितावर खूष नाही, पण नाराज असल्याचे लक्षात यावे हाच उद्देश असतो. गेल्याच आठवड्यात अशाच पध्दतीने एक व्यावसायिक दिन साजरा झाला. त्याबाबत ‘विकासकांवर’ सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण कोल्हापूर शहरातील रस्ते केलेल्यांना वगळून, कोल्हापूर ते राधानगरी रस्त्याचे काम केलेल्यांना वगळून सर्वांना शुभेच्छा दिल्या. खरे तर ज्यांना वगळले, त्यांच्या कामाबाबत नाराजी दाखवणे हाच उद्देश या शुभेच्छा संदेशातून दिसून आला. पण त्या नाराजांनीही तशा पध्दतीने शुभेच्छा स्वीकारल्या, भविष्यात चांगले काम करण्याची शपथ घेत. बघू ते किती जागतात, त्या शपथांना...!! - तानाजी पोवार, कोल्हापूर
कुजबूज... शुभेच्छांचा वर्षाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST