शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur news: गणेशमूर्ती विसर्जन करायला गेला, पाय घसरुन युवक कृष्णा नदीत बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:08 IST

गणपती कोळी कुरुंदवाड: गणेशमूर्ती विसर्जन करताना बंधाऱ्यावरुन पाय घसरून कृष्णा नदी पात्रात पडल्याने गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला. विनायक रुकमना ...

गणपती कोळीकुरुंदवाड: गणेशमूर्ती विसर्जन करताना बंधाऱ्यावरुन पाय घसरून कृष्णा नदी पात्रात पडल्याने गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला. विनायक रुकमना आवटी (वय ३९) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल, मंगळवारी रात्री एकच्या सुमारास राजापूर बंधाऱ्यावर ही घटना घडली.गावातील वंदे मातरम् गणेश मंडळाची काल, मंगळवारी विसर्जन मिरवणूक होती. मिरवणूक संपवून राजापूर बंधाऱ्यावर विसर्जन करताना गणेशमुर्ती बरोबर तोल जावून विनायक व तमन्ना तोडकर दोघेही पात्रात पडले. तोडकरला पोहता येत असल्याने तो सुखरूप बाहेर आला. मात्र विनायकला पोहता येत असतानाही दम भरल्याने त्याचा बूडून मृत्यू झाला. विनायक बुडत असल्याचे समजताच सार्थक हिंगमिरे, अमित कोरे, प्रशांत चौगुले, प्रवीण चौगुले यांनी पात्रात उडी घेऊन त्याला बाहेर काढले व सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.विनायक उच्च शिक्षित असून व्यंकटेश शुगर्स (बेडकिहाळ, कर्नाटक) येथे स्लीप बॉय म्हणून नोकरीला होता. त्याच्या अपघाती निधनामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव