शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तुझी जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते रे भाऊ..?, आजपासून राज्यभरात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण

By विश्वास पाटील | Updated: January 23, 2024 11:12 IST

विश्वास पाटील  कोल्हापूर : तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का..? कुंटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर ...

विश्वास पाटील कोल्हापूर : तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का..? कुंटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर आराम पडावा म्हणून दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणेच आदी प्रकार करता काय अशी विचारणा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने आज मंगळवारपासून राज्यभरात होणाऱ्या मराठा व इतर खुल्या प्रवर्गातील सर्व्हेक्षणात केली जाणार आहे. माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक आणि परिचारिकांच्या मदतीने हे सर्व्हेक्षण ३० जानेवारीपर्यंत संपवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्याने शासनाने हे सर्व्हेक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. या प्रश्र्नांवलीमध्ये मुलभूत माहिती, कौटुंबिक प्रश्र्न, आर्थिक, सामाजिक स्थिती, आरोग्य विषयक माहिती संबंधित प्रश्र्न आहेत. त्याशिवाय कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तक्ते भरून ध्यायचे आहेत. ही प्रश्र्नावली कुटुंबप्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे. त्यात खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याच्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल असाही इशारा दिला आहे. त्याची सही, अंगठाही घेतला जाणार आहे.तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पध्दत आहे का, विधवा स्त्रियांना कुंकु लावण्याची, मंगळसुत्र घालण्याची परवानगी आहे का, विधूर पुरुषांचे आणि विधवांचे पुर्नविवाह होतात का, विधवांना शुभकार्यात बोलवले जाते का, त्यांना हळदीकुंकवाचा मान दिला जातो का, विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का, मुलीचा विवाह कुणाबरोबर करायचा याचा निर्णय कोण घेते असे प्रश्र्न विचारण्यात आले आहेत. तुमच्या समाजात पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का अशी विचारणा ही प्रश्र्नावली करते. नवसाला कोंबड्या-बकऱ्याचा बळी देण्याची पध्दत आहे का असेही त्यामध्ये विचारले आहे.सर्व्हेक्षणात कुटुंबातील कुणाला कुत्रा-माकड, साप-विंचू चावल्यावर किंवा कावीळ झाल्यावर कुणाकडे उपचाराला घेवून जाता या प्रश्र्नांला पहिला पर्याय तांत्रिक-मांत्रिकाचा दिला आहे. दुसरा पर्याय घरगुती उपचार आणि तिसरा पर्याय डॉक्टरचा दिला आहे. आयोगाला लोकांनी तांत्रिक-मांत्रिकाकडे जावे असे वाटते की काय अशीही विचारणा त्यामुळे झाली.१५४ प्रश्न विचारणारसर्वेक्षणात १५४ प्रश्र्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्र्नांवली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यातील अनेक प्रश्र्न आरक्षण राहिले बाजूलाच, नवे वाद निर्माण करणारे आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण