शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पाणीपुरवठ्याचा ‘खेळखंडोबा’ थांबणार कधी? पुन्हा पुरवठा बंद : दुरुस्तीचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:14 IST

कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? ...

ठळक मुद्देउपसा पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. परिणामी ई वॉर्डातील पाणीपुरवठा होणार नाही.

कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून विचारला जात आहे. चार दिवसांपूर्वी कळंबा टाकी व बुधिहाळकरनगर येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले नाही तोवरच आता शुक्रवारी (दि. २९) चंबुखडीजवळील ब्रेक प्रेशर टॅँकजवळील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या दिवशी ई वॉर्डचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

शिंगणापूर आणि बालिंगा योजनेवरील दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगून प्रत्येक आठवड्याला सतत पाणीपुरवठा खंडित ठेवला जात आहे. पूर्वी कधी तरीच चार-सहा महिन्यांतून एकदा दुरुस्तीचे काम हाती घेतले जात होते; परंतु अलिकडे प्रत्येक आठवड्यात दुरुस्ती काढली जात आहे. दोन्हीपैकी एका योजनेचा पाणीपुरवठा बंद ठेवला, तर त्याचा परिणाम निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असून, अशा वारंवार खंडित होणाºया पाणीपुरवठ्याला शहरवासीय वैतागले आहेत.

महापुराच्या काळात संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सलग १५ दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी परिस्थिती गंभीर असूनही शहरवासीयांनी वास्तव लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य केले; पण आता सगळी यंत्रणा चांगली असताना, नदीत पाणी मुबलक असताना पुन्हा पुन्हा पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ लागला आहे; त्यामुळे लोकांच्या संतप्त भावना आहेत.

श्ािंगणापूर ते कसबा बावडा मार्गावरील चंबुखडी येथील ब्रेक पे्रशर टॅँक येथील विशेष दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी हाती घेतले जाणार आहे. या दिवशी पाणी उपसा पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. परिणामी ई वॉर्डातील पाणीपुरवठा होणार नाही.पाणी न येणा-या भागांची नावे -१. ई वॉर्डातील गोळीबार मैदान, संपूर्ण कसबा बावडा, क ागलवाडी, लाईनबाजार, रमणमळा, नागाळा पार्क, कनाननगर, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, मार्केट यार्ड, महाडिक माळ, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, शाहूपुरी व्यापारपेठ, शाहूपुरी १ ली ते ४ गल्ली, बसंत बहार 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका