शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'सुवर्णमहोत्सवी'चा निधी, अजितदादा शिवाजी विद्यापीठाला देणार कधी? तब्बल २९ कोटींचा निधी 

By पोपट केशव पवार | Updated: September 16, 2023 14:05 IST

सर्व पातळीवर पाठपुरव्याची गरज

पोपट पवार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर निधीपैकी न मिळालेला २९ कोटी रुपयांचा निधी २०२४ पर्यंत देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात दिला खरा, मात्र, हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानेच प्राधान्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. निधी देण्याची मूळ घोषणा पवार यांनीच केली आणि तेच निधी द्यायचे विसरून गेले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने २०११ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ४५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. यातून स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲड बायोटेक्नॉलाॅजी मुख्य इमारत व मुलांचे वसतिगृह, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर ॲड म्युझियम कॉम्पलेक्स, कन्व्हेन्शन सेंटर, युवा विकास केंद्र, गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाउस व लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्र यांची कामे करण्यात येणार होती.

मात्र, हा निधी मंजूर होऊनही विद्यापीठाला लगेच मिळाला नाही. त्यामुळे नियोजनातील ही कामे अद्यापही रखडली आहेत. या मंजूर निधीपैकी आतापर्यंत केवळ १६.१० कोटी रुपयेच मिळाले आहेत. उर्वरित २८.९० कोटी मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

भैया माने यांनी करून दिली आठवणमुळात हा निधी आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी अर्थ खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. पुढे सरकार बदल्यानंतर हा निधी मिळण्यास विलंब लागला. गत आठवड्यात कोल्हापुरात सभेच्या निमित्ताने आलेल्या अजित पवार यांना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य भैया माने यांनी विद्यापीठाचा रखडलेला निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर पवार यांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत हा निधी देण्याची ग्वाही दिली. 

कशासाठी निधी मंजूर निधी प्राप्त निधी येणे बाकी
स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲड बायोटेक्नॉलाॅजी 
मुख्य इमारत व मुलांचे वसतिगृह 
१० कोटी ४.५७ ५.४३
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट८.८५ कोटी५.३५ ३. ५०
राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर ॲड म्युझियम कॉम्पलेक्स ४.९८मिळाला नाही ४.९८ कोटी
कन्व्हेन्शन सेंटर १० कोटी मिळाला नाही १० कोटी
युवा विकास केंद्र ३६ लाख १८ लाख १८ लाख
गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाउस३.१४ कोटी मिळाला नाही ३.१४ कोटी
लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्र ३ काेटी सर्व मिळाला 
    
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठAjit Pawarअजित पवार