शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रायगडाला जेव्हा जाग येते नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:00 IST

ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता.

ठळक मुद्देरायगडाला जेव्हा जाग येते नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात​​​​​​​ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या आठवणी झाल्या ताज्या

संदीप आडनाईककोल्हापूर : ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता.अभिनेते अविनाश देशमुख आणि मोहन जोशी यांनी १९८४ मध्ये सीमांत या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि ५ मार्च १९८४ रोजी कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ह्यरायगडाला जेव्हा जाग येतेह्ण या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग केला. या नाटकाचे अनेक प्रयोग शहरात आणि ग्रामीण भागांत झाल्याची आठवण ७८ वर्षीय ज्येष्ठ नाट्यवितरक शशिकांत रंगनाथ जोशी यांनी सांगितली.या नाटकात कोणत्याही पात्राच्या कमरेला तलवार नव्हती, हे आणखी वैशिष्ट्य होते. १९६२ साली प्रथमत: रंगभूमीवर आलेले हे नाटक १९६४ मध्ये वेगळ्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न अविनाश देशमुख यांनी केला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. या नाटकात शिवाजी साकारतानाच इथे ओशाळला मृत्यू या नाटकात अविनाश देशमुख यांनी औरंगजेबही साकारला होता.बादशाही लॉजमध्ये मुक्कामरायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचे सुमारे ३५ प्रयोग कोल्हापुरात झाले. ज्या ज्या वेळी इथे प्रयोग झाले, त्या त्या वेळी अविनाश देशमुख पत्नी स्वाती, मुलासह शशिकांत जोशी यांच्या बादशाही लॉजमध्ये मुक्काम करीत, अशी आठवण जोशी यांनी सांगितली. या नाटकात त्यांचे संपूर्ण कुटुंबच काम करीत होते. इतर कलाकारांसारखे नखरे त्यांनी कधी केले नाहीत, असेही जोशी म्हणाले.ग्रामीण भागांतील नाट्यप्रयोगांना प्रतिसादज्येष्ठ नाट्यवितरक कै. प्रफुल्ल महाजन आणि आनंद कुलकर्णी यांच्यासोबत अविनाश देशमुख यांनी अनेक प्रयोग केले. विशेषत: हातकणंगले, उत्तूर, पेठवडगाव येथे झालेल्या प्रयोगांना विशेष प्रतिसाद लाभल्याची माहिती गिरीश कुलकर्णी यांनी सांगितली. या नाटकासोबत त्यांनी इतरही अनेक नाटकांचे प्रयोग जिल्ह्यात केल्याची आठवण कुलकर्णी यांनी सांगितली.

 

टॅग्स :Natakनाटकkolhapurकोल्हापूर